शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५८ वर्षानंतरही ‘स्वातंत्र्य संग्राम सेनानी’चा दर्जा नाही

By admin | Updated: August 15, 2016 00:21 IST

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ‘करो या मरो’ या आंदालेनात भाग घेणाऱ्यास स्वातंत्र्य सेनानींचा दर्जा जिवंतपणी ....

अधिकारासाठी नातवाची धडपड : उच्च न्यायालयात मागीतली दाद नरेश रहिले  गोंदिया इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ‘करो या मरो’ या आंदालेनात भाग घेणाऱ्यास स्वातंत्र्य सेनानींचा दर्जा जिवंतपणी तर सोडा मृत्यूच्या ५८ वर्षानंतरही मिळाला नाही. स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली कल्लू यादव (गवली) यांचे हे प्रकरण असून आपल्या आजोबांच्या या अधिकारासाठी त्यांचा नातू धडपडत आहे. स्वातंत्र्यता संग्राम सेनानीच्या प्रमाणपत्रासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. शहराच्या दुर्गा चौक कृष्णपुरा वार्डातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी निहाली यादव यांच्या कामाच्या सन्मानासाठी त्यांचे नातू अविलाश ओमप्रकाश यादव यांनी मागील पाच वर्षापूर्वी अर्ज केला होता. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्यांच्या आजोबांना प्रमाणपत्र मिळाले नाही. परिणामी त्यांना न्यायालयात जावे लागले. स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली यादव यांच्या मृत्यूनंतर 33 वर्षाने २४ एप्रिल १९९० ला त्यांचे नातू अविलाश यांना मुंबई वरून महाराष्ट्र शासनाचे एक पत्र मिळाले. या पत्राच्या माध्यमातून निहाली यादव यांना स्वातंत्र्यता संग्राम सेनानीचे प्रमाणपत्र द्यायचे होते. निहाली यादव यांना शासनातर्फे झालेल्या तुरूंगवासाचे प्रमाणपत्र मागीतले होते. ते कागदपत्र तयार करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर अविलाशने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या माध्यमातून मुंबई येथील सामान्य प्रशासन विभागाला अर्ज केला होता. या अर्जासोबत यादव यांनी जबलपूर कारागृह, अतिरिक्त महानिदेशक व भोपाल च्या तुरूंग महानिरीक्षक, जबलपूर चे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, जबलपूर येथील वैद्यकीय अहवाल व हेयरशिप रिपोर्ट अर्जासोबत जोडले होते.५ जानेवारी २०१५ ला मुंबई सामान्य प्रशासन विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र मिळाले. पत्रात निहाली यादव स्वातंत्र्यता संग्राम सेनानी आहेत व मुंबई प्रशासन विभागाद्वारे त्यांना स्वातंत्र्य संग्राम सेनानी घोषित करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. पत्रात स्पष्ट उल्लेख केला होता की,स्वातंत्र्यता संग्राम सेनानी सन्मान सेवानिवृत्ती वेतन योजना १९५६ अंतर्गत फक्त पत्नीला पेंशन मिळू शकते.परंतु १९८०, १९९०, २००८ व २००९ च्या शासन निर्णयानुसार अविवाहित मुलगा-मुलगी, नाती-नातू, भावाचा मुलगा किंवा कुटुंबातील सदस्यांना पेंशन दिली जाऊ शकते. स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेंशन योजनेंतर्गत तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या तपासणीनंतर कुटुंबाला पेंशन लागू करण्यात येते. परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. भोगला १४ महिन्यांचा कारावास स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली यादव यांनी ८ आॅगस्ट १९४२ च्या ‘करो या मरो’ आंदोलनात भाग घेतला. यासाठी त्यांना जबलपूर कारागृहात १४ महिने ठेवण्यात आले. २४ मार्च १९५७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळाले नाही निहाली कल्लू यादव यांच्या कुटंबियांना जसे प्रमाणपत्र पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळाले नाही. मुंबई मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणाले, आधी पेंशन करीता अर्ज पाठवावे त्यानंतर पेंशन लागू झाल्यावर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे प्रमाणपत्र लागू करण्यात आले. परंतु निहाली यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पेंशनसाठी अर्ज करणारा कुणीच नसल्याने स्वातंत्र्य संग्राम सेनानी प्रमाणपत्र मिळणार कसे? जबलपूर तुरूंगाच्या प्रमाणपत्रावर शासन प्रमाणपत्र देऊ शकते. मात्र हे प्रमाणपत्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे अडकलेले आहे.