शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तब्बल ५० वर्षांनी लागले कटंगला फळ

By admin | Updated: April 27, 2015 00:29 IST

ग्रामीण भागात काटेरी बांबूची झाडे असतात, त्यांना कटंग म्हणतात. कटंगला ६० वर्षांनी फळ लागते,

१०० ते २०० रूपये किलो : विविध स्वादिष्ट व्यंजनांसाठी उपयोगविजय मानकर सालेकसाग्रामीण भागात काटेरी बांबूची झाडे असतात, त्यांना कटंग म्हणतात. कटंगला ६० वर्षांनी फळ लागते, अशी माहिती वृद्ध सांगतात. त्यांच्यानुसार सन १९६६ मध्ये कटंगच्या झाडांना फळ लागले होते. त्यानंतर ५० वर्षांनंतर आता सन २०१५ मध्ये परिसरात सर्वत्र कटंगला फळे लागली आहेत.कटंगाचे लाकूड मजबूत व टिकावू असून ग्रामीण भागात कौलारू घरांसाठी केला जातो. शिवाय इमारती व इतर कामासाठी वापर केला जातो. कटंगाचे खाली पडलेले फळ गोळा करून त्यांचे तांदूळ तयार करून भाकरी बनविल्या जातात. तसेच काही लोक ते तांदूळ विकून अर्थार्जन करीत आहेत. प्रथम कटंगाचे फळ व त्यापासून तयार होणारे तांदूळ पाहून अनेकांना नवल वाटत आहे. कटंगचे फळ जवच्या फळासारखे असते. त्यापासून तयार केलेले तांदूळ गव्हासारखे दिसतात. मात्र त्यात चिकटपणा कमी असल्याने पोळीऐवजी भाकर बनविणे जास्त सोईस्कर असते. या भाकरीचा स्वाद मिळताजुळता तांदळाच्या भाकरीसारखा असतो. वयोवृद्धांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कटंग ६० वर्षांनी एकदा फळाला येतो. मात्र या वेळी ५० वर्षांनी फळाला आले असून, १० वर्षांपूर्वीच कसे फळाला आले, याचे आश्चर्य वयोवृद्धांना होत आहे. त्यांच्यानुसार, कटंगचे झाड एकदा फळले की आपोआपच नष्ट होते व पुन्हा काही कामाचे नसते. पुढे प्रकृतीने नवीन झाड उगवले तर पुढील काळात फळ येतात, असे म्हणतात. यावर्षी सर्वत्र कटंगच्या झाडांना बहर आला असून प्रत्येक झाड जुने असो किंवा नवे सर्वांना कटंग फळलेले दिसत आहे.कटंगाचे झाड रांझी स्वरूपात असून याची जाडी बांबूपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असून मजबूत असते. एकाच तनाला खालीपासून वरपर्यंत काटेरी शाखा असतात. त्यामुळे प्रत्येक बुडापासून निघालेले तन व त्यांच्या शाखा एकमेकात फसलेली असतात. या झाडावर चढने शक्य नसते. त्यामुळे खाली पडलेले फळ गोळा करणे सोईस्कर ठरते. आरोग्यवर्धक कटंगचे तांदूळतांदूळ व गव्हामध्ये असणारे पोषक तत्त्व कटंगमध्ये असतात. प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. पाचक, स्वास्थवर्धक, पोटांच्या विकारावर विशेषकरून यकृताच्या विकारावर लाभदायक असते. कटंगपासून बनणाऱ्या तांदळाचे भात, खीर, लाडू व इतर व्यंजन बनविले जाते. तसेच पिठापासून भाकर, भजे, खीर, मुष्ठे, थापोडे यासारखे स्वादिष्ट व्यंजन तयार केले जाऊ शकतात. कटंगच्या तांदळाला किंवा पिठाला इतर अन्नधान्यातही मिसळून उपयोगात आणले जातात. ग्रामीण भागातील लोकजीवनात एकदा तरी कटंगाचे भात किंवा भाकर खाल्यास स्वत:ला भाग्यवान समजले जाते. त्यामुळेच कटंगाचे तांदूळ १०० ते २०० रूपये प्रतिकिलोप्रमाणे विकले जाते. खाण्याची आवड असलेले लोक पैशाची पर्वा न करता खरेदी करून घेतात.दुष्काळात कटंगच्या तांदळाचा वापरसन १९६६ मध्ये मोठा प्रमाणात कटंगला फळ आले होते. त्यावर्षी सर्वत्र कोरड्या दुष्काळाचा फटका बसला होता. अन्नधान्याचा अभाव झाला होता. तेव्हा अनेक लोक कटंगचे फळ गोळा करून त्यापासून मिळणाऱ्या तांदळाने आपला उदरभरण करीत दिवस भागवेत होते, असे सांगितले जाते. परंतु आता ५० वर्षांनी मोठे परिवर्तन घडले असून अन्नधान्याचे भरपूर भांडार असल्याने केवळ शौक किंवा आवड तर काही जन आठवण म्हणून कटंगच्या तांदळाचा उपयोग करीत आहेत.