शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमधील साडेतेरा हजार लिटरचे ऑक्सिजन टँक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

खा. प्रफुल्ल पटेल यांच्या सूचनेवरून तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, तसेच अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतृून ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार होते. दरम्यान, हे काम संथगतीने सुरू होते, तर दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली होती. 

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांची यशस्वी चर्चा : ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यास होणार मदत, मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून साडेतेरा हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक असणारे ऑक्सिजन टँक गुरुवारी (दि.२२) रात्री मेडिकलमध्ये दाखल झाले. खा. प्रफुल्ल पटेल यांनी ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करण्यासंदर्भात अदानी वीज प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर प्लांट उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँक उभारण्यास सहा महिन्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या सूचनेवरून तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता, तसेच अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतृून ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार होते. दरम्यान, हे काम संथगतीने सुरू होते, तर दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली होती. माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुद्वा वांरवार ही बाब खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, तसेच पालकमंत्री नवाब मलिक यांनी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अदानी वीज प्रकल्पाने मेडिकलसाठी १३,५०० लिटर क्षमतेचे टँक गुरुवारी मेडिकलला उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे पूर्ण लक्ष असून, माजी आ. राजेंद्र जैन हे सातत्याने जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 

आयनाक्स कंपनीकडून होणार ऑक्सिजनपुरवठा जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी खा. पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणारी आयनाक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. त्यानंतर दोन दिवसांत २० हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर आता ऑक्सिजन टँक दाखल झाल्याने ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यास मदत होणार आहे. मेडिकलमध्ये ऑक्सिजन टँक दाखल झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नानू मुदलियार, नगरसेवक विनीत सहारे, सुनील पटले, रौनक ठाकूर यांनी टँक घेऊन येणाऱ्या चालकाचे स्वागत केले.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या