शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

प्रशासनाचा 'तो' फलक दिशाभूल करणारा

By admin | Updated: September 17, 2015 02:07 IST

प्रशासनातर्फे नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची होणारी फसगत होण्यापासून वाचविले जाते.

साकोली : प्रशासनातर्फे नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची होणारी फसगत होण्यापासून वाचविले जाते. चुकीच्या प्रकाराला आळा बसविण्यात येते. मात्र साकोली येथे तर चक्क प्रशासनच नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येते. ज्या गढकुंभली रोडवरील दोन्ही मंदिरे भुईसपाट करण्यात आली. त्या ठिकाणी पंचायत समितीतर्फे एक फलक लावण्यात आला व या फलकावर कार्यालय पंचायत समिती साकोली असे दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मात्र पंचायत समितीच इथे नाही ही नागरिकांची दिशाभूल नाही काय?साकोली येथील गढगुंभली रोडवर नवीन तहसील कार्यालयाच्या बाजूला शासकीय जागेवरील अतिक्रमण काल हटविण्यात आले. या जागेवर कार्यालय पंचायत समिती साकोली असा फलक लावण्यात आला. मात्र हा फलक जुना असून आधी हा फलक एकोडी रोड येथे लावला होता. काल मंदिराचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनातर्फे तयारी झाली व ऐन वेळेवरच हा फलक तेथे लावण्यात आला. या फलकावर पंचायत समिती कार्यालय असे लिहिले आहे. प्रत्यक्षात हा फलकच जनतेची दिशाभूल करणारा आहे. तो पाहून कुणालाही धक्काच बसेल, असा प्रकार साकोली येथे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)पाच वर्षापूर्वी झाला निधी मंजूरमहामार्ग चौपदरीकरणाचे कामात येथील पंचायत समितीची इमारत पाडण्यात आली. त्यामुळे हे कार्यालय इतरत्र हलविण्यात आले. त्यामुळे प्रशासनातर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील जागेवर व्यापार संकुल व नवीन पंचायत समितीची इमारत तयार करण्याचा प्रस्ताव होता. या पंचायत समितीच्या इमारतीसाठी १ कोटी ८० लाख ९६ हजार रूपयेही मंजूर करण्यात आले होते. मात्र स्थानिक नागरिकांचा विरोध पंचायत समिती जिथे होती त्याच ठिकाणी तयार करा, अशी भूमिका साकोलीवासीयांनी घेतली अखेर हा प्रस्ताव तसाच रखडला व आलेला निधी परत गेला.परत पाच वर्षानंतर प्रशासनाला अचानक जाग आली व नवीन तहसील कार्यालयाच्या बाजूची जागा निश्चित करण्यात आली. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागात चौकशी केली असता सदर नवीन इमारतीची किंमत ही आजच्या दरानुसार जवळपास ३ ते ४ कोटी रूपयाच्या एवढी जाणार. त्यामुळे या प्रक्रियेला अजूनतरी पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागणार हे निश्चित.