शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाज विकासापासून दूर

By admin | Updated: May 29, 2015 01:24 IST

आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली भाषा, वेशभूषा, रुढी, परंपरा व संस्कृती आहे. ती इतर जातीच्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे.

शेंडा (कोयलारी) : आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली भाषा, वेशभूषा, रुढी, परंपरा व संस्कृती आहे. ती इतर जातीच्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. आदिवासी जमातीची भारतीय इतिहासात एक वेगळी ओळख आहे. परंतु राजकीय नेते स्वत:च्या स्वार्थासाठी आदिवासींची कुचंबना करीत आहेत. तसेच आदिवासी समाजातील राजकीय नेतेसुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून आदिवासी जमातीच्या पोटात खंजीर खूपसण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आजही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर असल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून केला जात आहे. आदिवासी समाजाला आजतोवर देशपातळीवर समाजाचे नेतृत्व करणारा कणखर नेता मिळाला नाही. समाजाचे नेतृत्व करण्याचा आव बाळगणारे राजकीय नेते स्वत:च्या स्वार्थापोटी समाजाला राजकारणाच्या काळ्या बाजारात विकण्याचा कुटील डाव रचतात. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर आहे, असे नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ, आॅल इंडिया आदिवासी कर्मचारी संघटनांनी प्रसिद्धी पत्रांद्वारे कळविले आहे.खा. अशोक नेते स्वत: आदिवासी समाजाच्या आरक्षण कोट्यातून खासदार झाले. त्याच समाजाच्या अधिकाराचे व आरक्षणाचे हनन करण्याचा कुटील डाव खेळत असाल तर नैतिक जबाबदारी स्वीकारुन आदिवासी आरक्षणातून मिळालेले खासदारकीचे पद सोडावे व नंतर समाज विरोधी खेळी करण्यास मोकळे आहात, अशी टीका आदिवासी संघटनेच्या नेत्यांंनी केली आहे.इतर समाजाप्रमाणे आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाची निर्मिती केली. शिक्षणातून उन्नती होईल या उदात्त हेतूने आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवून करोडो रुपये खर्ची घातल्या जाते. परंतु त्याचा फायदा मूळ आदिवासींना होत नाही. खेड्यापाड्यात, जंगल खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींची मुले आजही शिक्षण क्षेत्रात मागे आहेत. यावर आदिवासी नेत्यांनी मंथन करणे गरजेचे आहे. आदिवासी समाजातील नवतरुण, तरुणी, कर्मचारी, शेतमजूर, शेतकरी यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यांची जागा कोठे आहे, हे दाखवून द्यावे. त्यासाठी संघर्ष करण्यासाठी संघटीत व्हावे.समाजाची अस्मिता, स्वाभिमान, अभिमान व संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघटित होवून समाज विरोधी काम करणाऱ्या राजकीय नेत्यांना हाकलून लावावे, असे आदिवासी विद्यार्थी संघ, नॅशनल आदिवास्ौी फेडरेशनचे अध्यक्ष जगदीश खंडाते, योगेश इळपाते, संजय प्रधान, दिनेश सलामे व इतरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (वार्ताहर)