शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

By admin | Updated: September 6, 2014 23:55 IST

‘शिक्षक दिना’निमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांवर कार्यरत ११ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा

गोंदिया : ‘शिक्षक दिना’निमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांवर कार्यरत ११ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सभापती कुसन घासले, शिक्षणाधिकारी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी ११ आदर्श शिक्षकांचा तसेच ७४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकांमध्ये पी.पी. शिंदे (गोंदिया), यशवंत भगत (गोरेगाव), चुन्नीलाल बोपचे (तिरोडा), मनोहर डोंगरे (सडक/अर्जुनी), के.ए. मेश्राम (अर्जुनी/मोरगाव), सुरेश कश्यप (देवरी), एम.एस. नागपुरे (सालेकसा), शोभा मच्छिरके (आमगाव), माध्यमिक विभागाचे महेंद्र सोनवाने (आमगाव), टी.बी. बावनकुळे (सालेकसा) व विशेष विभागातून जयश्री सिरसाटे (गोंदिया) यांचा समावेश आहे. तर जिल्हा परिषद व खासगी संस्थेतील वर्ग ४ ते १२ वीच्या परीक्षेत शालेय स्तरावरुन प्रथम, तालुका व जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय तसेच वर्ग ४ थी व ७ वीच्या शिष्यवृत्तीमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये पौर्णिमा वाढई (मरामजोब), शिवानी पंधरे (चिचटोला), प्रियंका लांजेवार (गोरेगाव), हर्ष बोहरे (गोंदिया), जिनोतवाज शेख (तिरोडा), प्रणाली मानकर (तिरोडा), कांचन निर्वाण(सौंदड), रणदीप वाढवे (माहुली), वैभव पटले (फुक्कीमेटा), शिवाणी खोटेले (सातगाव), लक्षीका आसोले (सातगाव), प्राची रहांगडाले (मुंडीपार), सोनाली राऊत (मुंडीपार), भावेश ठेंगडी (गोंदिया), चिन्मय रत्नपारखी (गोंदिया), पल्लवी घरजारे (तिरोडा), सागर बारापात्रे (तिरोडा), मयुर डोये (सौंदड), अबोली गजापुरे (बोपाबोडी), समीर अब्दुलमुनीर कुरैशी (अंजोरा), महिमा मांढरे (बोरकन्हार), मोनिका राऊत (डवकी), ममीता भलावी (पुराडा), दिपाली वाघमारे (परसटोला), हर्षिका अनुले (परसवाडा), योगेश बिसेन (साकरीटोला), दिप्ती उपराडे (कावराबांध), निकिता पटले (गोरेगाव), काजल चौधरी (एकोडी/दांडेगाव), परीश दाते (दवनीवाडा), शिवकुमार बानेवार (काटी), प्रणाली मडामे (बनाथर), त्रिवेणी पटले (करटी/बु.), नागेश्वर बिसेन गांगला), कल्याणी नंदेश्वर (वडेगाव), प्रेरणा रहांगडाले (तिरोडा), पंकज चौके (सुकडी/डाक.), मंगेस येरणे (परसवाडा), योगेश्वरी बहेकार (सडक/अर्जुनी), मोहीत बडोले (सौंदड), अजय सोनवाने (आमगाव), पंकज चौधरी (कट्टीपार), कमलेश केकती (ककोडी), सुमेद शहारे (अर्जुनी/मोरगाव), छबीकुमार टेंभुर्णे (नवेगावबांध), नेहा पिपातले (बोंडगावदेवी), शुभम भैसारे (अर्जुनी/मोरगाव), सोनू गेडाम (अर्जुनी/मोरगाव), राहूल शहारे (नवेगावबांध), सीमा कटरे (कावराबांध), पुनित शरणागत (गोरेगाव), सिद्धार्थ वाघाडे (गोरेगाव), डिंपल शरणागत (दांडेगाव), पुजा खजरिया (दांडेगाव), तुलसी बर्वे (दवनीवाडा), दुर्गावती पाचे (काटी), रजनी बानासुरे (तिरोडा), पुनम पटले (सुकडी/डाकराम), कोमल कापसे (परसवाडा), आचल टेंभरे (वडेगाव), सोनाली रंगारी (सडक/अर्जुनी), अजयकुमार मडावी (देवरी), सुनील उईके (देवरी) यांचा समावेश आहे.राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. समाजातील निम्न स्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत शिक्षक आपल्या कर्तृत्वाने समाजमनाला जोडण्याचे काम करतात. आजचे चिमुकले हे उद्याचे भाग्यविधाते आहेत, हे लक्षात ठेवून शिक्षकांनी कार्य करुन खऱ्या अर्थाने आदर्शता जपावी, असा सल्ला यावेळी बोलताना ेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिला. शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित या सत्कार सोहळ्यात शिक्षण विभाग व सर्वशिक्षा अभियानाचे कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. (जिल्हा प्रतिनिधी)