शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोषींवर कारवाई होणार

By admin | Updated: August 25, 2015 02:24 IST

तालुक्यातील सोनारटोला येथील शाळकरी १८ वर्षीय युवती आरती रवींद्र बारसे हत्याकांड प्रकरणाची चौकशी करण्याकरिता

देवरी : तालुक्यातील सोनारटोला येथील शाळकरी १८ वर्षीय युवती आरती रवींद्र बारसे हत्याकांड प्रकरणाची चौकशी करण्याकरिता व मृतक युवतीच्या कुटुंबीयांना सांत्वना देण्याकरिता क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी रविवारी बारसे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच घटनास्थळावर सालेकसा येथील ठाणेदारांना बोलावून त्यांंना या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.यावेळी मृतक आरतीचे वडील, काका व मामा यांनी आमदारांना घटनेची विस्तृत माहिती दिली व घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या निवेदनात संपूर्ण गावकऱ्यांनी गावातीलच आरोपी योगराज हेमराज चकोले याच्यावर आरोप करीत त्याला त्वरित कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सहा महिन्यापूर्वी योगराजने या युवतीसोबत छेडखानी केली होती. त्यासंबंधी सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी १०० रूपयांच्या मुद्रांकावर मुलाकडून लिहून घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी योगराज तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होता. त्यानंतरही योगराज आरतीला वारंवार त्रास देत होता. १८ आॅगस्टला तिला घरात एकटे पाहून योगराजनेच आपल्या सहकाऱ्यांसोबत आरतीची हत्या करून तिला विहिरीत फेकल्याचा आरोप व तो गावकऱ्यांना मदतही करीत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. . (प्रतिनिधी)चक्काजाम आंदोलनाचा इशारा४सदर हत्याकांडातील आरोपी गावातीलच असून त्याच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आरोपीवर कारवाई करून मृत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. आरोपीवर कठोर कारवाई त्वरित न केल्यास गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.