शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनीज काढणाऱ्या सात जणांवर कारवाई

By admin | Updated: July 6, 2017 02:04 IST

तालुक्यातील हरदोली साझा क्रमांक ५ मध्ये अवैधरित्या ३४६ ब्रास गिट्टी व बोल्डर काढणाऱ्या सात जणांवर

तहसीलदारांनी ठोठावला ३६ लाखांचा दंड लोकमत न्यूज नेटवर्क देवरी : तालुक्यातील हरदोली साझा क्रमांक ५ मध्ये अवैधरित्या ३४६ ब्रास गिट्टी व बोल्डर काढणाऱ्या सात जणांवर नवनियुक्त तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनीयम १९६६ च्या ४८/७ नुसार दंडात्मक कारवाई करून ३६ लाख रूपयांचा दंड ठोठावला. तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी हरदोली साझ्यामध्ये येणाऱ्या ओवारा व हरदोली येथील सात जणांनी शासनाची परवानगी न घेता ३४६ ब्रास गिट्टी व बोल्डर उत्खनन करून संग्रहीत केले होते. यावर हरदोलीच्या तलाठी पी.एम.मेश्राम यांनी कारवाई करीता तहसीलदारांना अहवाल सादर केला होता. त्यावर नवनियुक्त तहसीलदार विजय बोरूडे यांनी बुधवारी (दि.५) आदेश काढून सातही जणांवर दंडात्मक कारवाई केली. यात विश्वनाथ मंसाराम वलके (रा.ओवारा) यांना १५ ब्रास गिट्टी व बोल्डरकरिता १ लाख ५६ हजार रूपये, तेजराम दशरथ मदनकर (रा.देवाटोला) यांना १५ ब्राससाठी १ लाख ५६ हजार रूपये, मंगल मेश्राम (रा.अ‍ेवारा) यांना १०० ब्राससाठी १० लाख ४० हजार रूपये, संतोष मारोती मोटघरे (रा.ओवारा) यांना ५० ब्राससाठी ५ लाख २० हजार रूपये, कैलाश बोरकर (रा.देवाटोला) यांना १०० ब्राससाठी १० लाख ४० हजार रूपये, कारू खरोले (रा.ओवारा) याना ५० ब्राससाठी ५ लाख २० हजार रूपये व रामचंद्र वलके (रा.ओवारा) यांना १६ ब्राससाठी १ लाख ६६ हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंडाचे ३६ लाख रूपये शासनाला त्वरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तहसील कार्यालयाला शासनाकडून २२ लाख रूपयांचे वार्षिक लक्ष्य दिले गेले होते. या कारवाईमुळे सरकारी खजिन्यात ३६ लाख रूपये जमा होणार असल्याने तहसीलदार बोरूडे यांच्या कारवाईचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे. तर दुसरीकडे तहसीलदारांच्या या दबंग कारवाईमुळे अवैधरित्या गौण खनीज काढणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.