शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई थंड

By admin | Updated: May 22, 2015 02:00 IST

महागाव वितरण केंद्रांतर्गत लाईनमन ईश्वर चंद्रभान निंबार्ते यांना विद्युत खांबावर काम करीत असताना विजेचा धक्का लागला.

अर्जुनी-मोरगाव : महागाव वितरण केंद्रांतर्गत लाईनमन ईश्वर चंद्रभान निंबार्ते यांना विद्युत खांबावर काम करीत असताना विजेचा धक्का लागला. उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. महावितरण उपविभाग अर्जुनी-मोरगाव तर्फे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. मात्र अद्यापही त्यांना अटक व कारवाई करण्यात आली नाही. महिना लोटूनही विद्युत निरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मोरगाव येथे विद्युत खांबावर काम करीत असताना लाईनमन ईश्वरला विजेचा धक्का लागला. यात तो भाजला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. प्रथमदर्शनी कनिष्ठ अभियंता मोदनकर व लाईनमन भक्ते यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. लाईनमन भक्ते यांना निलंबित करण्यात आले. १५ मे रोजी देवरीचे कार्यकारी अभियंता वाकडे तसेच १६ मे रोजी महावितरण नागपूरचे वरिष्ठ अधिकारी मराठे यांनी मृतकाच्या घरी जावून कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात कनिष्ठ अभियंता मोदनकर, लाईनमन भक्ते व सहाय्यक लाईनमन चौधरी हे दोषी असून अद्यापही त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. महावितरणतर्फे याप्रकरणी अत्यंत संथगतीने चौकशी सुरू आहे. विद्युत निरीक्षकांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. महिना लोटला तरी अहवाल प्राप्त झाला नसल्याने कुठे तरी पाणी तर मुरत नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, छायाचित्र तसेच इतर दस्तावेजांची मागणी केली आहे. पोलीस विभागातर्फे त्यांना माहिती पुरविण्यात आली. मात्र महावितरणचा अद्यापही तपास सुरूच आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत कारवाई झाली नाही तर उपोषणावर बसण्याचा ईशारा कुटुंबीयांतर्फे देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)