शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

‘खर्चापाणी’ मागणाऱ्या ३९ जणांवर कारवाई

By admin | Updated: December 30, 2015 02:23 IST

खर्चापाणीच्या नावावर लाच मागणाऱ्या ३९ जणांवर यावर्षी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांना पकडले आहे.

एसीबीसाठी २०१५ ठरले भरभराटीचे : ४८ आरोपींवर एसीबीचा दणका गोंदिया : खर्चापाणीच्या नावावर लाच मागणाऱ्या ३९ जणांवर यावर्षी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांना पकडले आहे. या ३९ कारवायांत ४८ आरोपी असून एसीबीच्या या दणक्याने जिल्हाभरात आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवायांचा हा आकडा आता दिवसेंदिवस वाढतच चालला असून सन २०१५ हे वर्ष एसीबीसाठी भरभराटीचेच ठरल्याचे दिसून येते.काम करण्यासाठी टेबलाच्या खालून खर्चापाणी किंवा मिठाईच्या नावावर पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. आजघडीला पैशांच्या या देवाण-घेवाणीची एक परंपराच निर्माण झाली आहे. चपराशा पासून ते अधिकाऱ्यांपर्यंत, एवढेच काय लोकसेवकही आता पैशांची मागणी करू लागल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. लाचखोरीच्या या प्रकारांवर आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे. हा विभाग अशा या लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कार्य करतो. लाचखोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोंदियात सन २००९ पासून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीचा सन २०१३ पर्यंतचा काळ विभागासाठी तेवढा अनुकूल ठरला नाही. मात्र सन २०१४ पासून विभागाने यशाची पायरी चढण्यास सुरूवात केली. सन २०१४ मध्ये विभागाने २७ कारवाया केल्या आहेत. यामध्ये ३० आरोपीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. सन २०१५ हे वर्ष मात्र एसीबीसाठी चांगलेच भरभराटीचे लाभले असल्याचेही दिसून येत आहे. कारण गोंदियात कार्यालय सुरू झाल्यापासून यंदा एसीबीने सर्वाधीक ३९ कारवाया केल्या आहेत. या ३९ कारवायांत पथकाने ४८ जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील कारवाई सुरू आहे. म्हणजेच यावर्षी १२ कारवायांची वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे गोंदिया पथकाने केलेल्या या कारवायांसह भंडारा पथकाने जिल्ह्यात तीन कारवाया केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)