शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या कुटुंबातूनच सुखाची प्राप्ती

By admin | Updated: July 18, 2016 00:08 IST

वाढत्या लोकसंख्येमुळे आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक कुटुंब त्यांच्या मुलभूत गरजासुध्दा पूर्ण करु शकत नाही.

उषा मेंढे : सुरक्षित मातृत्वदिन कार्यक्रमात मार्गदर्शन गोंदिया : वाढत्या लोकसंख्येमुळे आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक कुटुंब त्यांच्या मुलभूत गरजासुध्दा पूर्ण करु शकत नाही. कुटुंब छोटे असेल तर सुखाची प्राप्ती होण्यास मदत होते, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. जिल्हा परिषद सभागृहात जागतिक लोकसंख्या दिन तसेच सुरक्षीत मातृत्व दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून अध्यक्षस्थानावरून त्या मार्गदर्शन करीत होत्या. अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आरोग्य समितीचे सभापती पी.जी. कटरे, समाजकल्याण समितीचे सभापती देवराज वडगाये, महिला व बालकल्याण समितीचे सभापती विमल नागपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत, गोंदिया पं.स. सभापती स्नेहा गौतम, आमगाव पं.स. सभापती हेमलता डोये, जि.प. सदस्य शेखर पटले, विजय लोणारे, ज्योती वालदे, उषा शहारे, सीमा मडावी, गोरेगावचे माजी पं.स. सभापती आरती चव्हाण, माजी पं.स. सदस्य मंगला पाखमोडे, आशा अगळे यांची उपस्थिती होती. मेंढे पुढे म्हणाल्या, लोकसंख्या नियंत्रणासाठी तात्पुरते उपाय म्हणून निरोध, कॉपर-टी तर स्थायी उपाय म्हणून पुरूष नसबंदी शस्त्रक्रि या, स्त्री नसबंदी शस्त्रक्रि या इत्यादी साधनांचा अवलंब करावा, असेही त्या म्हणाल्या. डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मुलीच्या जन्माचे स्वागत करावे. मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता मुलगी हीच खरी वंशाचा दिवा आहे, असे समजावे. कारण मुलगी दोन्ही घरी प्रकाश देते. जुने, पारंपरीक व भुरसटलेले विचार त्यागून मुलांचा अट्टाहास सोडून ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ ही संकल्पना स्वीकारावी. पीसीपीएनडीटी एक्टनुसार गर्भिलंग निदान करणाऱ्या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, स्वयंसेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, औषध निर्माण अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. गहलोत यांनी मांडले. संचालन डॉ.मीना वट्टी यांनी केले. उपस्थितांचे आभार साथरोग अधिकारी बी.आर.पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. विनोद चव्हाण, डॉ. चौरागडे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी) लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ प्रास्ताविकातून डॉ. गहलोत यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजना तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी उपलब्ध साधने याबाबतची माहिती दिली. पुरूष नसबंदी केल्यास १ हजार ४५१ रूपये व स्त्री नसबंदी केल्यास ६०० रु पये मोबदला. तर इतर लाभार्थ्यांना २५० रु पये मोबदला देण्यात येते. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत दोन मुली किंवा एका मुलीवर शस्त्रक्रि या केल्यास दोन हजार रूपये रोख लाभार्थ्यांच्या थेट खात्यात व ८ हजार रूपयांचे बचत प्रमाणपत्र देण्यात येते, असे सांगितले.