शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन स्थळाचा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविल्याचा आरोप

By admin | Updated: November 14, 2016 00:29 IST

पर्यटनस्थळ चोरखमारा शिव मंदिर तसेच पर्यटन स्थळ बोदलकसा रेस्ट हाऊस येथील सिमेंट क्रांक्रिट रस्त्याचे

पत्रकार परिषद : हिरामन बावनकर यांची माहिती तिरोडा : पर्यटनस्थळ चोरखमारा शिव मंदिर तसेच पर्यटन स्थळ बोदलकसा रेस्ट हाऊस येथील सिमेंट क्रांक्रिट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. एक बॅग सिमेंटमध्ये २५ घमेले रेती व १५ घमेले गिट्टी वापरुन बनविण्यात आले आहे, असा आरोप हिरामन बावनकर यांनी पत्रकार परिषदेत केला.चोरखमारा पर्यटनस्थळ शिवमंदिर येथील सिमेंट क्रांक्रिटचा रस्त्याची अंदाजे किंमत नऊ लाख ९९ हजार ७३१ रुपये तर बोदलकसा पर्यटन स्थळ रेस्ट हाऊस येथील सिमेंट-कांक्रिटचा रस्ता नऊ लाख ९९ हजार २६४ रूपयांचा खर्च आहे. सदर दोन्ही कामांचे सुरू करण्याचे आदेश २१ जुलै २०१६ ला कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग क्र.१ गोंदिया यांनी दिले आहे. हे दोन्ही बांधकाम सर्वदय मजूर सहकार संस्था तिरोडा अंतर्गत करण्यात आले. सदर दोन्ही बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे. गुण नियंत्रक (क्वालिटी कंट्रोल) यांनी कामाची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.बांधकाम सुरू असताना काम करणारे मंजूर हे सर्वदय मजूर सहकार संस्था तिरोडाचे नव्हते. त्याबाबत मजुरांची व्हीडीओ शुटिंगसुद्धा घेतल्याचे सांगितले. याबाबत निकृष्ट कामाची तपासणी व्हावी, तसेच सर्वेदय मजूर सहकारी संस्था तिरोडा, शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत बावनकर यांनी केली. याबाबत शाखा अभियंता, उपअभियंता यांच्याशी संपर्क मोबाईलवरुन होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी )