शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दररोज घडताहेत अपघात : गतिरोधक तयार करण्याची मागणी

By admin | Updated: May 31, 2015 00:50 IST

येथील कामठा चौकात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हा चौक डेंजर झोन म्हणून

आमगाव : येथील कामठा चौकात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हा चौक डेंजर झोन म्हणून ओळखला जात असून येथून ये-जा करण्यास नागरिकांना भिती वाटू लागली आहे. या प्रकाराकडे लक्ष देत सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे ब्रेकर तयार करण्याची तर पोलीस विभागाने वाहतुकीवर नियंत्रणासाठी व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. कामठा, कालीमाटी ते सालेकसा, डोंगरगड जाणाऱ्या राज्य महामार्गावर आमगाव येथील कामठा चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत्युचे तांडव सुरू आहे. येथे काही दिवसांपूर्वी रस्त्याचे नविनीकरण करण्यात आले, पण अद्याप ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसींग तयार करण्यात आले नाही. यामुळे कामठा किंवा सालेकसाकडून येणाऱ्या वाहनांत नेहमीच अपघात होताना दिसून येतात. या मार्गावरून कामठा मार्ग, बालाघाट, रावणवाडी, कालीमाटी, कट्टीपार, आमगाव ते सालेकसा, दरेकसा, डोंगरगड, दुर्ग, रायपूर येथील प्रवासी अधिक प्रमाणात प्रवास करतात. यामुळेच या रस्त्यावरून ट्रक, मालवाहक, चारचाकी गाडी व दुचाकींची वर्दळ अधिक असते. रस्ता तयार करताना कुठेच ब्रेकर किंवा क्राँसीग देण्यात आली नाही. तसेच दिशा दर्शकाचे फलक पण बसविण्यात आले नाहीत. कामठा चौकात पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र वेगवान वाहनांवर कारवाई होत नाही. त्यामुळे कॅमेऱ्यांचा उपयोग होत नसल्याचे बोलले जात आहे. पण लग्न सराईत वऱ्हाडी किंवा नवरदेवाच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी चालान कमीच फाडले पण कारवाई मात्र करण्यात आली असल्याचे नागरिकांडून बोलले जात आहे. येथील रस्त्यांवर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना लगाम घालासार्वजनिक बांधकाम विभागाने या चौकात एकही ब्रेकर तयार केले आहे. त्यामुळे वाहनचालक सोसाट्याने आपले वाहन घेऊन येथून निघतात. हेच कारण आहे की आल्या दिवशी येथे अपघात घडत आहेत. यावर उपाय म्हणून चौकात ब्रेकर तयार करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शिवाय वाहतूक विभागाने वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणीही केली जात आहे.