शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समितीला ठाणेदारांची आकस्मिक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 02:09 IST

इटखेडा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची बैठक सुरू असताना अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार प्रशांत भस्मे यांनी आकस्मिक भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क इटखेडा : इटखेडा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची बैठक सुरू असताना अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार प्रशांत भस्मे यांनी आकस्मिक भेट दिली. तसेच तंटे सोडविण्यात प्रत्यक्ष सहभाग घेवून काही प्रकरणांचा निपटारा करण्यात सहकार्य केले. गावखेड्यांमध्ये निर्माण होणारे तंटे आपसी सामजस्याच्या माध्यमातून सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर गठीत करण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती महत्वपूर्ण काम करीत आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या सन्मानाला ठेच न पोहोचविता समितीसमोर आलेल्या प्रकरणांवर यशस्वी तोडगा काढून तंट्यांचे निराकरण करण्यात समितीच्या सदस्यांचा मोठा सहभाग असतो. यात पोलीस विभागाचेही मोठे योगदान प्राप्त झाल्याने इटखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने अनेक प्रकरणे निकाली काढले. तसेच आपापसामध्ये शांतीपूर्ण वातावरण निर्मितीसाठी हातभार लावला आहे. येथील तंटामुक्त गाव समितीची कार्यवाही सुरु असताना अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार भस्मे यांनी अचानक भेट देऊन समितीच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत काही प्रकरणांचा निपटारा लावण्यात आपले योगदान दिले व समितीच्या कार्याची प्रशंसा केली. आपसामधील भांडण-तंटे सामंजस्य व सौहार्दपूर्ण वातावरणात सोडविण्यासाठी किंबहुना तंटे उद्भवणार नाही, यासाठी दक्षता घेण्याबाबत तंटामुक्त समिती, अर्जदार-गैरअर्जदार यांना विशेष मार्गदर्शन केले. सोमवारी ३ जुुलैला तंटामुक्त समितीसमोर ९ प्रकरणे आली होती. अर्जदार-गैरअर्जदार उपस्थित झाल्याने सहा प्रकरणांचा यशस्वी तोडगा काढण्यात आला. समितीचे अध्यक्ष मोरेश्वर भावे, समन्वयक व पोलीस पाटील विकास लांडगे तसेच समितीच्या सदस्यांनी ठाणेदार प्रशांत भस्मे यांचे स्वागत केले. याप्रसंगी समितीचे सदस्य पुंडलिक धोटे, विश्वनाथ गोठे, इस्तारी वासनिक, जयदेव मेश्राम, अस्मिता घोरमोडे, गुणा गोठे, यादवराव गोठे, बब्बुभाई शेख, शालिकराम सुखदेवे, पोलीस हवालदार इस्कापे, सरपंच अस्मिता वैद्य, तुुलशीदास गोंडाणे, अर्जदार-गैरअर्जदार व ग्रामस्थ उपस्थित होते.