शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बीअरचे बॉक्स भरलेल्या मेटॅडोरचा अपघात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

एकोडी : अदानी वीज प्रकल्पातील राख वाहून नेणाऱ्या ट्रकने कट मारल्यामुळे बीअरचे बॉक्स भरून असलेल्या मेटॅडोरचा अपघात झाला. दांडेगाव ...

एकोडी : अदानी वीज प्रकल्पातील राख वाहून नेणाऱ्या ट्रकने कट मारल्यामुळे बीअरचे बॉक्स भरून असलेल्या मेटॅडोरचा अपघात झाला. दांडेगाव शिवारात रविवारी (दि. १४) सकाळी ८.३० वाजतादरम्यान हा अपघात झाला. या अपघातानंतर मात्र मद्यशौकिनांची चांगलीच लॉटरी लागली. कित्येकांनी मेटॅडोरमधून मोठ्या प्रमाणात बीअरच्या बाटल्या लंपास केल्याचे दिसले.

सविस्तर असे की, रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा महामार्गावर गोंदियाकडून अदानी येथील राख वाहून नेणाऱ्या टिप्परने दांडेगाव शिवाराजवळ कट मारल्याने बीअरच्या बॉक्सने भरलेल्या मेटॅडोर क्रमांक एमएच २७-एक्स ४३१९ चा चालक अजय मधुकर सोनटक्के याचा वाहनावरील ताबा सुटला व मेटॅडोर उलटला. हा मेटॅडोर बीअरचे बॉक्स नागपूरकडून गंगाझरी व गोंदिया येथील वाईन शॉपमध्ये सोडण्यासाठी जात होता.

बीअरच्या बाटल्या भरलेल्या मेटॅडोरचा अपघात झाल्याची बातमी परिसरात पसरताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या तसेच घटनास्थ‌‌ळालगत गावातील लोकांनी गर्दी केली व आपापल्या परीने कोणी बीअरने भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स तर काहींनी खुल्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पळवून नेल्या. या अपघातामुळे गोंदिया-तिरोडा मार्गावरील वाहतूक २ तास खोळंबली होती. घटनास्थळावर गंगाझरी पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असले तरी अपघातग्रस्त मेटॅडोरमधून बीअरच्या बाटल्या पळवून नेणाऱ्या लोकांपुढे तेही निकामी ठरताना दिसले. सुदैवाने या अपघातात चालक-वाहकांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. परंतु परिसरातील शौकिनांची अपघातामुळे चांगलीच लॉटरी लॉटरी लागली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.