राजेश मुनिश्वर - सडक/अर्जुनीनवेगावबांध व्याघ्रप्रकल्प हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पण या बकी गेटचा प्रचार, प्रसार करण्यासाठी वन्यजीव विभाग काहीसा मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. १ मे चे औचित्य साधून नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचे बकी गेट सुरु करण्यात आले. दरवर्षी १५ जून पर्यंत पर्यटकांना आनंद घेण्यासाठी प्रवेश मिळत होता. पण या वर्षी पावसाच्या उशीरा आगमनामुळे वन्यजीव विभागाने ती तारीख पुढे करून ३० जूनपर्यंत पाठवली आहे. याचा फायदा पर्यटकांनीसुद्धा घेतला आहे.नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी या वर्षी भिलाई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, रायपूर आदी ठिकाणाकडून पर्यटक आल्याची नोंद आहे. येणारे बहुतेक पर्यटक हे नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा या गावाकडून येतात. त्यांना व्याघ्र प्रकल्पात शिरण्यासाठी बकी हे गेट फक्त सहा किमी अंतरावरच पडते. हेच पर्यटक जर नवेगावबांध मार्गे गेल्यास त्यांना ३२ किमी धाबेपवनी मार्गे जावे लागते. पण बकी गेट कडून गेल्यास विविध पॉर्इंट पहावयास मिळतात. यात झलकारगोंदी तलाव हा निसर्गाने नटलेल्या पहाडीच्या सानिध्यात असल्यामुळे या तलावावर बिबट, रानहल्ले, रानगवा, अस्वल, सांबर, हरिण, रानकुत्रे, रानडुक्कर आदी प्राणी दिसतात. ते प्राण्यांचे कळत ही पर्यटकांना पाहता येतो. जंगल झाडी ही रस्त्याचे दुतर्फा असल्यामुळे पर्यटकांना खरा आनंद घेता येतो. पर्यटकांना पर्यावरणाचा आनंद घेता यावा यासाठी नवेगावबांध राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाचे चारही बाजंूनी नवीन गेट सुरु केले. पण त्या गेटवरुन जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर विविध प्राण्यांचे फोटो व माहितीचे फलक कोहमारा चौकात लावून पर्यटकांना जाण्यासाठी सोपा मार्ग तयार केला. बकी गेट कोहमाऱ्यावरुन किती लांब आहे. याचेही फलक लावायला हवे. बकी गेटमार्गे जाण्यासाठी एक नकाशा कोहमारा चौकात लावणे गरजेचे आहे. या प्रचार व प्रसारामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोहमारा, चौकात विसावा घेऊन ते पुढील पर्यटकांना पूर्ण आनंद घेतील. कोहमारा चौकात ही माहिती लावण्यास चौकातील दुकानदारांचे व्यवसायात वाढ होवून पर्यटकांना पुरेपूर माहिती मिळेल. येणारे काही पर्यटक हे दोनचाकी वाहनाने येतात. पण त्यांना चारचाकी वाहनाशिवाय या प्रकल्पात जाताच येत नाही. त्यामुळे कोहमारा चौकात भाड्याने वाहने घेण्यासाठीसुद्धा कायदेशीर होईल. कोहमारा चौकात खासगी वाहण भाड्याने मिळत असल्यामुळे पर्यटकांना त्रास होणार नाही. १ मे पासून आजपर्यंत १९ चारचाकीने पर्यटक आल्याची नोंद आहे. पर्यटक प्राण्यांचे दर्शन घेऊनच परतीचा प्रवास केल्याचे अभिप्राय त्यांनी दिला. पुढील वर्षात या बकी गेटमार्गे पर्यटकांची रिघ वाढणार असल्याची चर्चा होत आहे. या प्रकल्पात कोणत्याही व्यक्तीला वनात जाणे बंद झाले.
बकी गेटमधून होणार लाखो पर्यटकांचा प्रवेश
By admin | Updated: June 22, 2014 00:02 IST