शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

धान केंद्रांना बारदान्यांची त्वरित पूर्तता करा

By admin | Updated: December 23, 2016 00:56 IST

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ देवरीद्वारे सालेकसा व देवरी तालुक्यात खरीप हंगामातील धान

सहशराम कोरोटे : धान खरेदी केंद्रावर सामुग्रीचा अभाव देवरी : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ देवरीद्वारे सालेकसा व देवरी तालुक्यात खरीप हंगामातील धान हमी भावात घेण्याकरिता आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत एकूण २७ धान खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु या धान खरेदी केंद्रावर नवीन बारदाना नसल्याने शेकऱ्यांनी आपले धान विकणे बंद केले आहे. त्यामुळे बारदान्यांची त्वरित पूर्तता करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे. बारदान्यांअभावी या भागातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. तर दुसरीकडे या धान खरेदी केंद्रावर धान विकून ती रक्कम ई-पेमेंटद्वारे बँकेच्या खात्यात जमा झाली आहे. परंतु जिल्हा सहकारी बँकेत नवीन नोटांची पूर्तता करने शासनाने बंद केल्याने शेतकऱ्यांच्या हातात वेळेवर रक्कम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तरी शासनाने सर्व धान खरेदी केंद्रावर नवीन बारदान्याची आणि जिल्हा सहकारी बँकेत नवीन नोटांची पूर्तता त्वरित करावी, अशी मागणी कोरोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. सहषराम कोरोटे यांच्या मते, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच देवरीच्या आदिवासी विकास महामंडळाने आपली मागणी पत्राद्वारे केली होती. आता या मुख्यालयाद्वारे असे लेखी कळविण्यात आले आहे की, सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रावर जे शेतकरी आपले धान जुन्या बारदान्यात भरुन देतील त्या शेतकऱ्यांना १० रुपये प्रति बारदान्यामागे अधिकचे पैसे द्यावे. अशा परिस्थितीत जर ज्या शेतकऱ्यांकडे जुना बारदानाच नाही, त्यांनी काय करावे? त्यांंनी आपले धान केंद्रावर विकू नये? हेच आहे काय अच्छे दिनाचे स्वप्न, अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कोरोटे पुढे आपल्या पत्रात सांगतात, जर शासनाला खरच शेतकऱ्यांचे दु:ख हरपायचे असेल तर त्यांनी देवरीच्या आदिवासी विकास महामंडळाला सूचना कराव्यात की त्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडून जुना बारदाना खरेदी करुन सर्व खरेदी केंद्रावर बारदान्याची पूर्तता करावी. तसेच आतापर्यंत आदिवासी विकास महामंडळ द्वारे एकूण २७ खरेदी केंद्रावर एकूण १८ कोटी रुपयांच्या जवळपास धानाची खरेदी झाली आहे. याची सर्व रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात ई-पेमेंट द्वारे जमा करण्यात आली आहे. परंतु अशा सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते हे जिल्हा सहकारी बँकेत आहेत. शासनाने या बँकांना नवीन नोटांची पूर्तता करणे बंद केल्याने अशा सर्व शेतकऱ्यांवर फार मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अशा स्थितीत त्यांचा वाली कोन, असा प्रश्न उपस्थित करुन शासनकर्त्यांनी सर्व सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रावर नवीन बारदान्याची आणि जिल्हा सहकारी बँकेत नवीन नोटांची पूर्तता त्वरित करावी, अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे. मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास या मागणीला धरुन काँग़्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)