शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीचे अधिकारी भासवून केली २५ हजारांची मागणी

By admin | Updated: June 5, 2015 01:50 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांकडून आंगणवाडी सेविकेला गंडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एक ताब्यात, दुसरा पसार : अंगणवाडी सेविकेला गंडविण्याचा प्रयत्नगोंदिया : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांकडून आंगणवाडी सेविकेला गंडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळील फुलचूर येथील आंबाटोली परिसरात गुरूवारी (दि.४) दुपारी ३ वाजता दरम्यान हा प्रकार घडला. प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला. आरोपी नरेश मेश्राम (४५,रा.मुर्री) व त्याचा एक साथीदार या दोघांनी आंबाटोली निवासी आंगणवाडी सेविका फिर्यादी मनिषा टेकेश्वर कटरे (४०) यांच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. या दोघांनी कटरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी असल्याचे सांगून २५ हजार रूपयांची मागणी केली. एवढेच नव्हे तर त्यांना क्षती पोहचविणार अशा धमकावणी करून त्यांच्यावर दबाव टाकला. यावर मात्र कटरे यांना संशय आल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात फोन करून सदर नावाचे इसम विभागात कार्यरत आहेत काय याची विचारणा केली. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या नावाचे इसम विभागात नसल्याचे सांगण्यात आले. यावर त्यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. लगेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कटरे यांच्या घरी गेले व त्यांनी नरेश मेश्राम यास ताब्यात घेतले. मात्र त्याचा दुसरा साथीदार पसार झाला. पोलिसांनी कटरे यांच्या तक्रारीवरून भादंवीच्या कलम १७०, ३८५, ४५२, ४१९, ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. (शहर प्रतिनिधी)१५ दिवसांपासून सुरू आहे हा प्रकार आंगणवाडी सेविकांच्या घरी जावून त्यांना किशोरवयीन मुलींना सुविधा, लाभ याशिवाय विविध प्रश्न विचारून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार मागील १५ दिवसांपासून सुरू असल्याचे कळले. हा प्रकार काही आंगणवाडी सेविकांसोबत घडलेला असल्याने कटरे यांनाही हा प्रकाराबद्दल माहिती होती. यामुळेच त्यांनी सावधगिरी बाळगून या तोतया अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केला.