शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ९५ मालमत्तांना ठोकले सील ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:25 IST

आतापर्यंत नगरपरिषद मालमत्ता वसुलीसाठी पथकाला नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी राजकीय दबाव तर कधी थकबाकीदारांकडून भांडण तंटे ...

आतापर्यंत नगरपरिषद मालमत्ता वसुलीसाठी पथकाला नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी राजकीय दबाव तर कधी थकबाकीदारांकडून भांडण तंटे केले जात असल्याने करवसुली होत नव्हती. परिणामी यंदा ११ कोटींच्या घरात मागील थकबाकी व चालू मागणीचा आकडा पोहोचला आहे. मात्र, विद्यमान मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी यंदा करवसुलीसाठी विभागाला कुणालाही न जुमानता थेट कारवाईचे अधिकारी दिले आहेत. त्यामुळे कर अधिकारी व उपमुख्याधिकारी विशाल बनकर यांनी पथक स्थापन केले असून वसुली मोहिमेला सुरूवात केली आहे. हे पथक थकबाकीदारांकडे जात असून कराचा भरणा केल्यास थेट सीलिंगची कारवाई करत आहे. यातूनच पथकाने आतापर्यंत एक कोटी ३२ लाख सात हजार रुपयांचा मालमत्ता कर थकवून बसलेल्या मालमत्ताधारकांच्या ९५ मालमत्तांना सील ठोकले आहे.

सील ठोकण्यात आलेल्या या मालमत्तांमध्ये सर्वाधिक ६७ दुकानी असून ९ घर, ४ मोबाईल टॉवर, १ बँक, ५

एटीएम, ३ खासगी इमारत, २ शासकीय इमारत, २ हॉटेल व २ गोदाम आहेत. एक कोटी ३२ लाख सात हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी करवसुली पथकाने या मालमत्तांना सील ठोकले आहे. दररोज करवसुली पथक वसुलीसाठी थकबाकीदारांकडे जात असून कराचा भरणा न करण्यांची मालमत्ता सील करत आहेत. परिणामी थकबाकीदारांत चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

--------------------------

सध्या ९ मालमत्तांनाच आहे सील

पथकाने आतापर्यंत ९५ मालमत्तांना सील ठोकले असून या कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकबाकी भरली आहे. अशात त्यांच्या मालमत्ताचे सील काढण्यात आले आहे. मात्र, सध्या ९ मालमत्तांना सील असून यामध्ये ६ दुकान, २ घर व १ गोदाम आहे. संबंधितांकडील करांचा भरणा आल्यावर यांचेही सील उघडून दिले जाईल.

-------------------------

यंदा होणार रेकार्ड ब्रेक वसुली

नगरपरिषद करवसुली पथकाच्या धडाकेबाज वसुलीमुळे यंदा थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. कराचा भरणा करा अन्यथा मालमत्तांची जप्ती हेच धोरण नगरपरिषदेने हाती घेतले आहे. परिणामी आता थकबाकीदार नगरपरिषदेत जाऊन करांचा भरणा करताना दिसत आहे. नगरपरिषदेत आतापर्यंत ५१ टक्के सर्वाधिक करवसुलीचा रेकॉर्ड आहे. मात्र, यंदा जोमात वसुली होत असल्याने जुना रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे दिसत आहे.