शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

९८७ गणेश मंडळांना वीज कुठून?

By admin | Updated: September 15, 2015 04:17 IST

संपूर्ण जिल्हाभर यावर्षीही सार्वजनिक मंडळांतर्फे गणेशोत्सव उत्सव साजरा केला जात आहे. लहान-मोठी हजारावर मंडळे

नरेश रहिले ल्ल गोंदियासंपूर्ण जिल्हाभर यावर्षीही सार्वजनिक मंडळांतर्फे गणेशोत्सव उत्सव साजरा केला जात आहे. लहान-मोठी हजारावर मंडळे जिल्ह्यात आहेत. त्यापैकी पोलिसांच्या नोंदीनुसार ९९० सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. परंतुु यापैकी फक्त तीन गणेशोत्सव मंडळांनीच अधिकृतरीत्या वीज कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केले आहे. उर्वरीत ९८७ गणेशोत्सव मंडळांना एकतर बाजुच्या घरातील वीज वापरावी लागणार किंवा थेट विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करावी लागणार आहे. यापैकी कोणतेही कृत्य हे बेकायदेशिरच असल्याने ते रोखण्यासाठी वीज कंपनी कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळाने या उत्सवासाठी वीज कनेक्शन मागणारा रितसर अर्ज महावितरणकडे करणे गरजेचे आहे. गोंदिया जिल्ह्यातील ९९० उत्सव मंडळांनी पोलिसांकडे गणेश स्थापनेची परवानगी मागितली. त्यातील बहुतांश मंडळे चोरीची वीज वापरण्याची शक्यता आहे. एकीकडे मंडप, रोषणाई, मिरवणुका, डि.जे. अशा भपकेबाजपणावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविणारे मंडळ १०-१५ हजाराच्या वीजेसाठी चोरी का करतात? ही बाब आश्चर्याची ठरत आहे.मागील चार वर्षापासून गणशोत्सव मंडळांवर दामिनी पथक कारवाई करणार अशा बातम्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झळकत असतात. मात्र एकाही मंडळावर कारवाई केल्याचे उदाहरण जिल्ह्यात नाही. गणेशोत्सवातील रोषणाईसाठी चोरीची वीज वापरल्या जात असल्याने वीज चोरीवर आळा घालण्यासाठी दामिनी पथक नेमण्यात आले. परंतु हे पथक गणेश स्थापनेपूर्वी वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याच्या पोकळ बातम्याच देतात, प्रत्यक्ष कारवाई मात्र कोणावरही करीत नाहीत. मग या काळात सर्वांनाच सरसकट वीज चोरीची परवानगी देणार का? असा सवाल काही सूज्ञ नागरिकांनी ‘लोकमत’कडे उपस्थित केला.तीेन वर्षापूर्वी ८५ मंडळांनी विद्युत कनेक्शनसाठी अर्ज केले होते. त्या मंडळांना कनेक्शन दिले. मात्र हजारोच्या जवळ असलेल्या गणेशोत्सव मंडळांनी वीज कनेक्शनसाठी अर्जच केले नाही. तरीदेखील गणेशोत्सव रोषणाईने साजरा करण्यात आला. जिल्ह्यात सडक अर्जुनी तालुक्यातील तीन अर्ज वगळता एकही अर्ज विद्युत कनेक्शनकरीता आलेला नाही. गोंदिया शहरातील मोठमोठ्या मंडळांपैकी एकाही मंडळाने वीज जोडणीसाठी अर्ज केलेला नाही, हे विशेष. गोंदिया शहरात ८० च्या घरात सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत. ज्या गणेश उत्सव मंडळांनी वीज कनेक्शन घेतले नाही ते मंडळ घरगुती कनेक्शनवरून वीज वापरतील किंवा वाहिन्यांवर आकडे टाकतील. विद्युत विभागाने जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांना अधिकृत वीज कनेक्शन घ्या, असे आवाहन केले. विशेष म्हणजे यासाठी सवलतीचे वीज दर आकारले जाणार आहे. तरीदेखील अनेक मंडळांनी वीज कनेक्शन घेतलेले नाही.दामिनी पथक झाले पोरके ४वीज चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी गोंदियात ‘दामिनी’ पथक कार्यरत होते. यापूर्वी या पथकाने वीज चोरट्यांवर किती कारवाया केल्या हे गुलदस्त्यात असले आहे. आता ऐन गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना या पथकाच्या प्रमुख श्रीमती चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे दामिनी पथकाचा सध्या कोणीच वाली नाही. त्यामुळे गणेशोत्सवात यावर्षीही नेहमीप्रमाणे वीज चोरीला उधान येणार की महावितरणचे वरिष्ठ अधिकारी कारवाईसाठी पुढाकार घेणार याकडे गोंदियावासीयांचे लक्ष लागले आहे.वीज चोरी पकडणाऱ्यांवर होतो चुकीचा आरोप४घरात, व्यापारासाठी किंवा सार्वजनिक कामासाठी वापरण्यात येणारी वीज चोरी पकडण्यासाठी विद्युत विभगाचे कर्मचारी, अधिकारी गेल्यास त्यांच्यावर विनयभंगासारखे खोटे आरोप केले जातात. दोन वर्षाआधी गोंदिया शहरातच दुर्गा उत्सवादरम्यान एका उत्सव मंडळाच्या सदस्यांनी विद्युत कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की केली. त्या कर्मचाऱ्यांचे कगदपत्र फाडून त्यांच्या अस्मीतेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारामुळे कर्मचारीही कारवाई करण्यास धजावत नाही. मात्र ही कारवाई करण्यासाठी पोलीस विभाग मदत करण्यास तयार असताना महावितरणचे अधिकारी केवळ आपली जबाबदारी ढकलण्यासाठी हे कारण देत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.गणेश मंडळांना कमी वीजदर गोंदिया : सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात. तसेच तीन रूपये ७१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रतियुनिट तीन रूपये ७१ पैसे इंधन अधिभार असे वीजदर आहेत. हा दर घरगुतीपेक्षाही कमी आहे. त्यामुळे वाणिज्यीक वीज जोडणीतून गणेश उत्सवासाठी अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास तो आर्थिकदृष्ट्या महाग राहणार आहे. धार्मिक उत्सवांकरिता अधिकृतच वीज पुरवठा घ्यावा व त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे यासाठीच तात्पुरत्या वीज जोडणीचा दर घरगुती वीजदरापेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यासाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी २४ तास सुरू असणाऱ्या महावितरणच्या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या त्या भागातील अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.सार्वजनिक सुरक्षेसाठी मंडळांनी हे करावे४ गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजन पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा व खांबांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.४वीज पुरवठा व जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिणीत प्रवाहीत झाल्याने प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता असते.४ जवळच्या वीज खांबावरून किंवा वीज वाहिन्यांवरून आकडे टाकून वीज पुरवठा घेऊ नये. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याचा धोका अधिक आहे.४वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी. तुटलेली किंवा लूज तार वापरू नये व वापरायची असल्यास प्रमाणित इन्सुलेशन टेप लावून जोडावी.