शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

९४८६ गावे तंटामुक्तीच्या मार्गावर

By admin | Updated: December 26, 2016 01:06 IST

गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, क्षुल्लक वादाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊ नये, गाव गाड्यातूनच तंट्याचा

दोन वर्षापासून तंटामुक्त गावांची घोषणाच नाही जातीय सलोखा राखून तंट्यावर केली मात १८ हजार ४२३ गावांत वाहते शांततेचे वारे नरेश रहिले ल्ल गोंदिया गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, क्षुल्लक वादाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊ नये, गाव गाड्यातूनच तंट्याचा निपटारा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत अख्या महाराष्ट्रात लोकचळवळ निर्माण झाली. त्यामुळे सातवर्षात १८ हजार ४२३ गावे तंटामुक्त झालीत. उर्वरीत ९ हजार ४८६ गावे तंटामुक्त होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र शासनाने दोन वर्षापासून तंटामुक्त गावांची घोषणा केली नाही. राज्यात २७ हजार ८९१ ग्राम पंचायती आहेत. यापैकी महाराष्ट्रातील १८ हजार ४२३ गावे तंटामुक्त ठरली. या गावांना मागील सात वर्षात ४३८ कोटी १८ लाख ६७ हजार रूपये बक्षीस देण्यात आले. या बक्षीस रकमेतून गावाचा विकास करण्यात आला आहे. लोकसहभागातून गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवितांना न्यायालयाच्या व पोलिसांच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी झाला. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले तंटे सामोपचाराने गावातच सोडविण्यासाठी गावातीलच विविध घटकांना एकत्र करून त्यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीने गावात आमूलाग्र बदल केला आहे. १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झालेल्या या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांततेची मशालच पेटविली आहे. ही मोहीम राबवून शासनाच्या निकषानुसार तंटामुक्त गाव मोहीम म्हणून पुढे आलेल्या तंटामुक्त गावांना लोकसंख्येच्या आधारावर शासनाने बक्षीसे वाटली. यात २००७-०८ या वर्षात २३२८ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ४८ कोटी ९० लाख ५० हजार रुपये मिळाली. २००८-०९ या वर्षात २८९१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ६८ कोटी ८३ लाख १७ हजार रुपये, २००९-१० या वर्षात ४२४९ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी १०१ कोटी ५५ लाख २५ हजार रुपये, २०१०-११ या वर्षात ३८२४ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ९३ कोटी ७१ लाख रुपये, २०११-१२ या वर्षात २७१२ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ६९ कोटी ५९ लाख २५ हजार रुपये, २०१२-१३ या वर्षात १७४१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये, २०१३-१४ या वर्षात ६७८ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ८ कोटी ९९ लाख ७५ हजार रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले. सामाजिक उपक्रमात अग्रेसर ४गावातील अवैध धंद्याना आळा घालून ते धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविले. स्त्रीभ्रुण हत्येवर आळा घालण्यासाठी कन्यारत्न जन्मानंद भेट मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा गौरव, नवविवाहित मुलींना माहेरभेट, जातीय सलोखा , हुंडाबंदी करण्यात आली. आंतरजातीय विवाह घडवून आणला. समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरा यावर आळा घातला. सण, उत्सव सामूहिकरीत्या शांततेत पार पाडणे सुरू आहे. महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिकांचा सन्मान, विधवा, परित्यक्ता यांना मदत, वृक्षारोपण करण्यात आले. या शिवाय गावाला शांततेच्या मार्गाने गावाचा विकास करण्यावर या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. तंटामुक्त गाव मोहीम सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.