शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

९३ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचा लाभ

By admin | Updated: May 30, 2016 01:38 IST

वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने मुरदोली या जंगल प्रभावित गावातील ९३ लाभार्थ्यांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे वितरण नुकतेच करण्यात आले.

गोरेगाव : वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने मुरदोली या जंगल प्रभावित गावातील ९३ लाभार्थ्यांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे वितरण नुकतेच करण्यात आले. वनविभागामार्फत मुरदोली येथील ९३ अनुसूचित जातीजमाती व ओबीसी प्रवर्गातील कुटुंबांना गॅसचे कनेक्शन सहायक वनरक्षक यु.टी. बिसेन, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एस. कदम, विजय बोपचे, ओ.व्ही. आग्रे, सरपंच ससेंद्र भगत, आर.एन. बहेकार, दिलीप मेश्राम, रोशन कटरे, एस.के. दिघोरे, वासुदेव बोपचे, चंद्रशेखर भुरेवार, ताराचंद धुर्वे, हरिचंद पटले यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक यु.टी. बिसेन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जंगलव्याप्त गावांमधून वनांची कटाई थांबण्यासाठी शासनाद्वारे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. जाळण्यासाठी लाकडाचा वापर न करता गॅसचा वापर करून आपली दैनंदिन गरज पूर्ण करता यावी म्हणून मोफत गॅसचे वितरण करण्यात आले. गावकऱ्यांना जंगलतोड थांबवून गॅसचा वापर करावा. वनाचे संरक्षण करावे. पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी जंगल वाढ करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सरपंच ससेंद्र भगत यांनी मुरदोली, जांभूळपाणी, गराडा, सोदलागोंदीचे सर्व वनग्राम योजनेत समाविष्ट वनांचे संरक्षण करीत असल्याचे सांगितले. संचालन रोशन कटरे यांनी केले. आभार एस.टी. दिघोरे यांनी मानले. (प्रतिनिधी)