शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

९२ गावांतील गोठ्यांचे नियोजन अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 00:21 IST

जिल्हा परिषद पंचायत समिती व राज्य शासनाच्या वतीने सालेकसा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत

जनावरांची समस्या : २२ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा दरेकसा : जिल्हा परिषद पंचायत समिती व राज्य शासनाच्या वतीने सालेकसा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाकडून बैल, गाय, शेळी, म्हशी इतर पाळीव जनावरांच्या पशुसंवर्धनाकरीता गोठा तयार करण्यासाठी योजना कार्यान्वित आहे. पण पंचायत समिती सालेकसा अंतर्गत एकूण ४३ ग्रामपंचायत आहेत. ९२ गावात २२ हजार शेतकऱ्यांना गोठा द्यायचे होते. परंतु मागील एक वर्षापासून गोठा देण्यात आले नाही. शासन परिपत्रक २०१२ प्र.क्र.३६ रोहयो १ दि.९ आॅक्टोबर २०१२ नुसार शेतकऱ्यांना पाळीव जनावरांच्या संवर्धनाचे गोठे तयार करून देण्यासाठी शासनाने प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसभेत यादी मंजूर करून लाभार्थ्यांना योजनाचे लाभ देण्यात यावी, पण काही ग्रामपंचायतमध्ये सभेत यादी मंजूर करण्यात आली. काही ग्रामपंचायतमध्ये ही योजना कशासाठी आहे याची लोकांना जाणीवच नाही. गोठे तयार करताना शासनापरिपत्रकाद्वारे ४०/६० च्या ग्रामपंचायतीमध्ये जास्त मातीचे काम झाले त्यांना १०० ते १५० गोठे मंजूर व्हावे, परंतु अधिकारी पदाधिकारी यांना जाणीवच नाही असल्याची बाब समोर येत आहे. ही योजना सन २०१२ पासून सुरू आहे. तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गोठे तयार करायचे होते. परंतु नियोजन न केल्यामुळे ही योजना कागदोपत्रीच राहीली. जि.प.चे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या पत्रानुसार शेळी व गायीचे गोठे संवर्धनासाठी शेड मंजुरीचे मार्ग शासनाकडून मोकळे झाले आहेत. पण काही ग्रामपंचायतच्या सचिवांना व सदस्यांना याची कल्पना नसल्यामुळे लाभार्थी वंचीत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या हितायोग्य अनेक योजना कार्यान्वित करते. परंतु मांजर कुठे आडवी जाते माहीत नाही. परिणामी शेतकरी योजनेपासून वंचित आहे. तालुक्यात बऱ्याच ग्राम पंचायतींनी ग्रामसभेत गोठ्याचे नियोजन केले नाही. काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत विषय घेऊन लाभार्थ्यांची यादी बनविली. लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत मंजूर झाली. परंतु यादी पुढील कार्यालयात पाठविण्यात न आल्याने पावसाळा सुरू होऊनही शेतकऱ्यांना गोठे मिळाले नाही. सर्व गोठ्यांची प्रकरणे त्वरीत पंचायत समितीला सादर करून लाभार्थ्याना लवकर गोठे बांधकाम करून द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)