शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

८८ कोटींची कामे ‘मॅनेज’

By admin | Updated: May 31, 2015 00:53 IST

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बांधण्यात आलेल्या ८८ कोटींच्या साठवण बंधाऱ्यांची कामे अधिकारी आणि

गोंदिया : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बांधण्यात आलेल्या ८८ कोटींच्या साठवण बंधाऱ्यांची कामे अधिकारी आणि कंत्राटदारांनी हातमिळवणी करून पूर्ण केली. यातील अनेक कामे अंदाजपत्रक दराच्या १८ ते २० टक्के अधिक दराने वाटली असून झालेल्या कामांचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.वर्ष २०१३-१३ यादरम्यान गोंदियासह भंडारा जिल्ह्यात ८८ कोटींची जलसंधारणाची कामे करण्यात आली. ही सर्व कामे गोंदियातील लघुसिंचन विभागाचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता (श्रेणी-१) यांच्या देखरेखीत झाली. त्यांच्यात मार्फत निविदा प्रक्रिया व कामे वाटप करण्यात आले. मात्र दर्जाहीन कामे पाहिल्यानंतर या कामात झालेला भ्रष्टाचार स्पष्टपणे दिसून येत आहे.गोंदिया तालुक्यातील नवरगाव (कला) येथील साठवण बंधाऱ्यासाठी २० टक्के अधिक किमतीच्या (१९ लाख ३० हजार) प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात यातून आमगाव तालुक्यातील करंजी गावात बांध बनविण्यात आला. त्या कामातही काँक्रिटच्या जागी दगडांचा वापर करण्यात आला. यासंदर्भात सन आॅफ फामर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती.सालेकसा तालुक्यातील कोपालगड, आमगाव तालुक्यातील बघेडा व मानेगाव येथील तलावांच्या कामावर ३० लाख ६६ हजार ६८३ रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या कामातही काँक्रिटच्या जागी मोठे दगड टाकण्यात आल्याने हे काम तुटण्याच्या स्थितीत आहे. सीओटीच्या कामात जुनी माती काढून त्या ठिकाणी काळी माती टाकली जाते. मात्र प्रत्यक्षात खोदकाम न करता आणि काळी माती न टाकताच पूर्ण काम व्यवस्थित झाल्याचे दाखवून अनेक कामांची बिले काढण्यात आली आहेत.यासोबतच झाडुटोला, बेलाटी, गिरोला, दतोरा, नवेझरी, बोथली येथील साठवण बंधाऱ्यांची कामे निकृष्ट आणि अर्धवट झाली आहेत. या कामांसंदर्भात अलताफ नसीमुद्दीन शेख यांनी राज्य शासनाच्या लोकायुक्तांकडे तक्रार करून गुणनियंत्रण विभागाकडून या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच कंत्राटदाराशी हातमिळवणी करून निकृष्ट कामांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या कामांसंदर्भात आधी सन आॅफ फामर्स असोसिएशनने तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता चौकशी सुरू झाल्यामुळे यात संबंधित अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)कामांची चौकशी सुरूयाप्रकरणी वरिष्ठांकडे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या सहायक मुख्य अभियंत्यांनी (पुणे) प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता, लघुसिंचन मंडळ नागपूर यांना दिले. याशिवाय प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण) विभाग, चंद्रपूर यांना नियुक्त केले. या अधिकाऱ्यांनी गोंदियात येऊन चौकशी केली आहे. पुन्हा ते चौकशीसाठी येणार असल्याची माहिती आहे.काही टेंडर वाढीव दराने गेले असले तरी काही अंदाजपत्रकापेक्षा कमी दरानेही गेले आहेत. कंत्राटदार कोणत्या दराने टेंडर भरतात यावर आमचे नियंत्रण नसते. कामाचा दर्जा निकृष्ट नाही असे मला वाटत नाही. याबाबत चौकशीसाठी समिती येऊन गेली आहे. त्यांनी आपल्या अहवालात काय दिले हे माहीत नाही.- सोनिया जाधवसहायक अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण)