शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

८५७ अपंगांना मिळणार जीवनोपयोगी साहित्य

By admin | Updated: December 7, 2014 22:53 IST

मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य

गोंदिया : मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य वाटप वैद्यकीय चाचणी शिबीरात पात्र ठरलेल्या ८५७ पात्र अपंगांना ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साहीत्य वाटप करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी व दिशा संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी दोन शिबीर घेण्यात आले. या दोन शिबिरात पात्र सुमारे चार हजार अपंगांना जीवनोपयोगी साहीत्य वाटप करण्यात आले. तर यंदा आॅयल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) व आटीर्फिशियल लिम्बस म्रन्युफॅक्चरंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एल्मिको) यांच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी अपंगांचे वैद्यकीय चाचणी शिबीर घेण्यात आले. यात एर हजार ३४ जणांची तपासणी करण्यात आली व त्यातील ८५७ अपंग जीवनोपयोगी साहीत्यासाठी पात्र ठरले. या अपंगांना येत्या ८ डिसेंबर रोजी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साहीत्य वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हात-पाय नसलेल्या अपंगांना कृत्रिम हाय-पाय देण्यात येणार आहे. सोबतच ट्रायसिकल, व्हीलचेअर, कुबड्या, श्रवणयंत्र, अंधकाठी, मॉडीफाईड सी.पी.चेअर तसेच कृत्रिम अवयव, कॅलीपर आदींचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. पात्र व्यक्तींनी आपल्या सोयीने शिबीरात वितरीत करण्यात येणारे साहीत्य सोबत घेऊन जाण्याची व्यवस्था करावी व नोंदणीच्या वेळी देण्यात आलेली पावती व ओळखपत्र सोबत आणाने अशी माहिती आमदार राजेंद्र जैन व दिशा संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवाशिष चॅटर्जी यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)