शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

८४ नळ योजनांना मिळाली मंजुरी

By admin | Updated: June 1, 2015 01:41 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आणखी ८४ नळ योजनांना मंजूरी मिळाली आहे.

कपिल केकत गोंदियाराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आणखी ८४ नळ योजनांना मंजूरी मिळाली आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाने मागील वर्षी दिलेल्या ९० योजनांनंतर आणखी ८४ योजना आता गावांत साकारणार आहेत. यात सर्वाधिक २० योजना तिरोडा तालुक्यातील आहेत. तर स्थानिक स्तरावर मंजूरी मिळालेल्या या योजनांमधील सुमारे ३० योजना राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पाणी जीवनाश्यक वस्तू असतानाच सर्वांना पाणी ही शासनाची मूलभूत जबाबदारी व नागरिकांचा अधिकार आहे. मात्र उन्हाळ््यात जिल्ह्यातील कित्येक गावांत पाणी पेटते. पाण्याअभावी गावकऱ्यांना इतरत्र भटकावे लागत असल्याचेही प्रकार जिल्ह्यात घडतात. याचे कारण आजही कित्येक गावांत नळ योजना नाही, तर काही गावांत वाढलेल्या लोकसंख्येमुळे असलेली योजना पुरेपूर पाणी पुरवठा करू शकत नाही. या सर्व प्रकारांवर जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभाग नजर ठेवून आहे. यातूनच जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई या प्रकारावर आळा घालण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सन २०१४-१५ मध्ये ९० योजना तयार केल्या. मात्र यानंतरही कित्येक गावांत नळ योजना नसल्याने किंवा वाढीव योजना देण्याची गरज असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सन २०१५-१६ मध्ये ८४ गावांत नळ योजना देण्याचा प्रस्ताव माडण्यात आला होता. या ८४ योजनांना स्थानिक स्तरावर मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे यातील काही योजनांतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. स्थानिकस्तरावर या योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यातील सुमारे ३० योजना दरडोई निकषात बसत नसल्याने त्यांना मंजुरी देणे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे. करिता या योजनांना राज्य शासनाकडून मंजुरी घ्यावी लागते. त्यानुसार सुमारे ३० योजना राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांनी सांगीतले. जिल्ह्यातील या गावांना मिळणार नळ योजना आमगाव : चिंताटोला, कोसमटोला, गिरोला, जामखारी, तिगाव. अर्जुनी-मोरगाव :चिचोली (जुनी), चिचोली (नवी), परसोडी र., पांढरवानी माल., तिडका, वडेगाव रेल्वे, खांबी, अरततोंडी, झाशीनगर, येरंडी, कन्हाळगाव नवेगावबांध. देवरी : आमगाव आदर्श, देवरी, हरदोली, मुरपार. गोंदिया : धामनगाव, किडंगीपार, मजीतपूर, एमआयडीसीटोली, मुंडीपार, मुंडीपारटोला, पारडीबांध, शिरपूर, शिवनी. गोरेगाव : दवडीपार, मलपुरी, मोहगाव तिल्ली, धुंदाटोला, बोरीटोला, पालेवाडा, पुरगाव. सडक-अर्जुनी : घाटबोरी, घटेगाव, गिरोला, खुर्शीपार, म्हसवानी, घाटबोरी तेली, डव्वा, बाम्हणी (खडकी), मुरपार, लेंडेझरी, मुंडरीटोला, सितेपार. सालेकसा : गिरोला, इसनाटोला, सोनारटोला, धनसुआ, कोटजंभुरा, मोकासीटोला, मुंडीपार, राजपूतटोला, पानगाव, बच्चनटोला, नवेगाव, निंबा, पोवारीटोला, तिरोडा : अत्री, बयवाडा, भजेपार, चांदोरी बू., चिखली, डब्बेटोला, धादरी, किडंगीपार, काचेवानी, टिकारामटोला, केसलवाडा, नांदलपार, मलपुरी, मनोरा, मुरमाडी, मुरपार, नवेगाव खु.,पालडोंगरी, खेडेपार, येडमाकोट.