शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने बाधित ८३ गावे वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 01:57 IST

परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत.

समाजमंदिरात आश्रय : मदतीचा दिलासा देण्याची मागणीकालीमाटी : परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत. अनेक गावात विद्युत खांब आणि डीपी कोसळल्याने संपूर्ण गावे अंधारात असून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.कालीमाटी परिसरात व आमगाव तालुक्यात एकूण ४३ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला. येथील गावात नागरिकांचे घर कोसळले तर काहीचे छप्पर उडून गेले. सुपलीपार येथे भिंत पडून मृतक राखडे (६०) यांचा मृत्यू झाला. बऱ्याच ठिकाणी घरातील जनावरे दगावल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसर चक्रीवादळाच्या दहशतीत अजुनही दिसत आहे. बहुतेक कुटुंबाचे अन्न, वस्त्र ढिगाऱ्याखाली आल्याने एक वेळचे जेवन निश्चित नाही. सध्या दररोज दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान निसर्ग आपला रंग बदलवीताना दिसतो. ५ ते १० मिनट सोसाट्याचा वारा वाहतो. त्यामुळे पुन्हा चक्रीवादळ तर नसेल ना? अशी भीती नागरिकांत दिसून येते. या चक्रीवादळाच्या तळाख्यात मृत्युमुखी पडलेल्या राखडे कुटुंबाला चार लाख रुपये, जनावरांसाठी एकूण रक्कम २७ हजार रुपये, ६७ घरांना २८ लाख ३६ हजार ९०० रुपये व इतर असे ३३ लाख ४६ हजार २०१ रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई करीता तहसीलदार साहेबराव राठोड यांनी जिल्हा आपत्ती निवारण समिती जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती सादर केली.निवाऱ्यासाठी भटकंतीचक्रीवादळाच्या कचाट्यात सापडलेल्या कालीमाटी येथील रुपचंद गिऱ्हेपुंजे, कृष्णा भांडारकर, हिरामण महारवाडे, लीलाधर गिऱ्हेपुंजे, लिखन टेंभरे, धनलाल रहांगडाले यांच्या घरावरील छत्र उडून गेले तर घनश्याम शेंडे, सोनू कापसे, यादोराव कावळे, माणिकचंद रहांगडाले, धनलाल रहांगडाले, केवल रहांगडाले आणि इतर नागरिकांच्या घराचे व कडधान्याचे नुकसान झाले आहे.गावे अंधारमयघाटटेमनी, कालीमाटी, कट्टीपार, भोषा, मानेकसा व इतर गावांत विद्युत विभागाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहे. गावातील विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाची बरीच हाणी झाली आहे. परिसरातील गावांमध्ये ६०-७० विद्युत खांब कोसळल्यामुळे तसेच विद्युत वाहिणी खंडीत पडल्याने बऱ्याच गावात पाच दिवस लोटूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. विद्युत उपकेंद्र कालीमाटी (कट्टीपार) येथील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी येथे अधिकारी, १२ कर्मचारी आणि इतर सहकारी रोजंदारी कर्मचारी युद्धपातळीवर रात्रंदिवस काम करीत असल्याचे दिसून येतात. या चक्रीवादळामुळे नागरिकांना अंधारमय जीवन जगण्यास भाग पाडले आहे.