शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

45-60 गटातील 822433 नागरिकांनी टोलवला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

आता पुढे कोरोनाला पाय पसरू द्यायचे नाही यासाठी शासनाने लसीकरणाला जोर दिला आहे. जिल्ह्यातही लसीकरण वेगात सुरू असताना दिसत आहे. मात्र पहिला डोस घेणाऱ्यांच्या संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरा डोस घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात मुदत संपूनही १७९३३५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोनाशी दोन हात करता येणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात असतानाही शुक्रवारच्या आकडेवारीनुसार तब्बल १७९३३५ नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून आले आहे. यामध्ये ४५-६० वयोगटातील नागरिकांचा सर्वाधिक समावेश असून तब्बल ६२४३३ नागरिकांनी मुदत संपूनही त्यांच्या दुसरा डोस टोलवला आहे. अशात कोरोनाशी दोन हात कसे करता येणार असा प्रश्न पडतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने जास्त कहर केला. खास बाब म्हणजे, दुसरी लाट सुरू होती तेव्हा कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण न झाल्याने दुसऱ्या लाटेने आपला कहर दाखवून दिला. हाती शस्त्र असूनही त्याचा वापर करता आला नाही या दुसऱ्या लाटेतील शोकांतिकाच म्हणावी लागणार आहे. मात्र आता पुढे कोरोनाला पाय पसरू द्यायचे नाही यासाठी शासनाने लसीकरणाला जोर दिला आहे. जिल्ह्यातही लसीकरण वेगात सुरू असताना दिसत आहे. मात्र पहिला डोस घेणाऱ्यांच्या संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरा डोस घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात मुदत संपूनही १७९३३५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही डोस घेणे गरजेचे असून त्याशिवाय कोरोनापासून सुरक्षा नाही, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. त्यानंतरी ४५-६० वयोगटातील तब्बल ८२४३३ नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नसून त्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचप्रकारे ६० व त्यापुढील वयोगटातील ४३८५७ नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस टोलवल्याचे दिसून येत आहे. दिसतोय तरुणाईचाही बेफिकीरपणा - दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात तरुणांचा बळी गेल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर परवानगी मिळताच लसीकरणासाठी तरुणाईच पुढे आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात १८-४४ गटातच मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, या गटातील ५३०४४ तरुणांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतलेला नाही. यातून तरुणांचा लसीकरणाला घेऊन बेफिकीरपणा उघडकीस पडत आहे. लसीकरणाची मागणी करणारेच आता लसीकरणाला पाठ दाखविताना दिसत आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या