शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बार-दारूदुकान बंदीमुळे ७५ टक्के महसूल बुडणार

By admin | Updated: April 5, 2017 00:57 IST

जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंतची दारू दुकाने आणि बारवर सर्वोच्च न्यायालयाच्या

सर्वाधिक फटका गोंदियात : १७८ दुकाने-बारला लागले सील गोंदिया : जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंतची दारू दुकाने आणि बारवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये १ एप्रिलपासून बंदी घातल्यानंतर जिल्ह्यात १७८ बार व मद्यविक्रीच्या दुकानांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले. त्यांचे परवाने रद्द करून हजारो लिटर मद्यसाठाही जप्त करण्यात आला. ५०० मीटरच्या नियमानुसारच पुढे परवान्यांचे नुतनीकरण केले जाणार असल्यामुळे काही काळासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आतापर्यंत मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत ७५ टक्के महसूल बुडणार आहे. दि.३१ मार्चच्या संध्याकाळी वाईन शॉपसोबत बिअर बारलाही हा नियम लागू राहील असा आदेश निघाल्यानंतर बंदीच्या कक्षेत येणाऱ्या सर्व बार आणि शॉपला सील लावण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सतत दोन दिवस सुरू होते. दुकाने आणि बार सील करताना तिथे असणारा मद्यसाठा जप्त करून आणि स्टॉक रजिस्टर व लायसन्स ताब्यात घेण्यात आले. हा मद्यसाठा परवानाधारक बार किंवा दुकानांना दिला जाणार आहे. बहुतांश दुकानदारांना ३१ मार्चनंतर आपले दुकान बंद होणार याची कल्पना असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त मद्यसाठा नव्हता, असे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले. ज्या दुकाने किंवा बारला सील केले त्यांना महामार्गापासून ५०० मीटरपेक्षा लांब अंतरावर आपले दुकान किंवा बार स्थानांतरित करताना स्थानांतरण शुल्क घेतले जाणार नाही. मात्र इतर सर्व प्रक्रिया त्यांना नवीन परवान्याप्रमाणे करावी लागणार आहे. त्यामुळे किमान वर्षभर मद्यप्रेमींची अडचण होईल. (जिल्हा प्रतिनिधी) - पुन्हा परवान्यासाठी मोठी कसरत रद्द करण्यात आलेल्या परवानाधारकांना ५०० मीटरचा नियम पाळून परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण ही दुकाने किंवा बार यांना मुख्य मार्ग सोडून नागरी वस्त्यांमध्ये जागा शोधावी लागणार आहे. भर मार्केट वस्तीमधील जागा मिळालेच असे नाही. मिळाली तरी ती परवडणारी नसेल. त्यामुळे नागरी वस्तीजवळ दुकान लावण्यासाठी त्या भागातील नागरिकांकडून होणाऱ्या संभावित विरोधाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. अवैध मद्यविक्रीला येत आहे उधाण दुकानांमधील किंवा बारमधील मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे. मात्र त्यापूर्वीच काही विक्रेत्यांनी स्टॉक रजिस्टरवर विक्री झाल्याचे दाखवून दारूच्या पेट्यांची गुप्त ठिकाणी विल्हेवाट लावली. आता त्या दारूच्या बाटल्या अव्वाच्या सव्वा दराने विक्री करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस त्या विक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत.