शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

७१३ बालकांवर शस्त्रक्रिया

By admin | Updated: May 20, 2017 01:48 IST

बाल मृत्यू व बाल रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) च्या माध्यमातून सुरू असलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बाल मृत्यू व बाल रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) च्या माध्यमातून सुरू असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात यशस्वी होत आहे. या कार्यक्रमांतर्गत ७१३ बालकांची शस्त्रक्रिया करण्यात आली. सन २०१३-१४ पासून ३१ मार्च २०१७ पर्यंत २२५ बालकांची हुदय शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची तपासणी करण्यात येते. आंगणवाडी व शालेय विद्यार्थी, शाळाबाह्य विद्यार्थी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्याच्या १४१० शाळांच्या दोन लाख ६ हजार १७९ बालकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले. यात दोन लाख ५९६ म्हणजेच ९७ टक्के बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १७ हजार ८७१ बालके आजारी असल्याचे लक्षात आले. याप्रमाणे दुसऱ्या टप्यात १७८६ आंगणवाडीच्या एक लाख ९ हजार १३९ बालकांची तपासणी करायची होती. त्यात १ लाख एक जार ३७५ म्हणजेच ९३ टक्के बालकांची तपासणी करण्यात आली. यात ५ हजार ८२२ बालके किरकोळ आजाराने ग्रस्त असल्याचे लक्षात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आला. शाळा व आंगणवाडीच्या बालकांच्या आरोग्य तपासणीत ७०८ बालकांची इतर शस्त्रक्रियेसाठी निवड झाली होती. यातील ६४९ बालकांची शस्त्रक्रिया करण्यात आली नाही.५९ बालकांचे आईवडील शस्त्रक्रियेसाठी तयार झाले नाही. हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे महत्त्वाचे सहकार्य राहीले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ट शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, नोडल अधिकारी डॉ. सतीश जायस्वाल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ४४० बालक हृदयरोगाने ग्रस्त सन २०१३-१४ पासून ३१ मार्च २०१७ पर्यंत ४४० बालक हृदयरोगाने ग्रस्त असल्याचे लक्षात आले. यातील २२५ बालकांची शस्त्रक्रिया करण्यात आली. १९० बालकांपैकी ३६ बालकांचे आईवडील शस्त्रक्रियेसाठी तयार झाले नाही. ५२ बालकांचा पाठपुरावा केला जात आहे. १२ बालकांना शस्त्रक्रियेची गरज नाही.१६ बालकांना औषध दिली जात आहे. २० बालके अति जोखमीची आहेत. ३२ बालकांची इतर कारणांमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली.७ बालके एपीएलमधील आहेत. सात बालके जिल्ह्यातून गेले आहेत. अतिरिक्त बजेटमुळे ८ बालकांची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. सन २०१६-१७ मध्ये ६४ बालकांची शस्त्रक्रिया करण्यात आली.