लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर अद्यापही रोवणी झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ८२ हजार हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीेचे नियोजन कृषी विभागाने केले. पण यंदा सुरूवातीपासून पाठशिवणीचा खेळ खेळला. त्यामुळे पेरणी आणि त्यानंतर रोवणीची कामे खोळंबली होती. जुलै महिन्यात थोड्या फार प्रमाणात बसरलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यात पुन्हा विश्रांती घेतल्याने रोवण्यापूर्ण खोळंबल्या. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी थोड्या प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला थोड्या फार प्रमाणात सुरूवात झाली.पण, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अजूनही सुमारे ७० हजार हेक्टर धानाची रोवणीच झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. दोन दिवसापूर्वी झालेला पाऊस सर्वदूर झाला असला तरी धानाची खराब झालेली नर्सरी लावण्यास उपयुक्त नाही. पाऊसही कुठे आहे कुठे नाही, अशा परिस्थितीत आता शेतकºयांच्या पडीक जमिनीचे सर्वेक्षण करुन पंचनामे करण्याची मागणी होत आहे.सरासरीच्या केवळ ५२ टक्केच पाऊसआता पावसाची सुरुवात झाली असली तरी तो खंड स्वरुपाचा असून एका ठिकाणी पडला तर दुसºया ठिकाणी पडत नाही. भाताची नर्सरी टाकून अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे रोवणी करुनही काही उपयोग नाही. ३१ आॅगस्टपर्यंत १०६४ मि.मी. पाऊस पडतो. पण यंदा केवळ ७३९ मि.मी. पाऊस झाला. तो सरासरीच्या केवळ ५२ टक्के आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाखांवर खातेदार शेतकरी असून सरकारनी गाजावाजा केलेल्या पिक विमा योजनेत फक्त ६० ते ६५ हजार शेतकºयांनीच भाग घेतला. तीच स्थिती शेतकरी कर्जमाफीची आहे.कृषी विभागाची आकडेवारी धक्कादायकजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत परशुरामकर सर्व प्रथमच कृषी विभागावर चर्चा घडवून आणली. तेव्हा जि.प. कृषी विभागाने जी आकडेवारी सभागृहासमोर ठेवली ती धक्कादायक आहे. जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात १७ हजार १३६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यात १२ हजार हेक्टर, सडक अर्जुनी ४ हजार हेक्टर, अर्जुनी मोरगाव ५९६ हेक्टर, देवरी १३ हजार २५३ हेक्टर, सालेकसा ३२०० हेक्टर, तिरोडा १४ हजार ७२८ हेक्टर, आमगाव २९३८ हेक्टर अशी सुमारे ७० हजार हेक्टरवर रोवणीच झाली नसल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर अद्यापही रोवणी झाली नसल्याची कबुली कृषी विभागाने दिली. त्यामुळे रोवणी न झालेल्या शेताचे पंचनामे करुन शासनाने दुष्काळ जाहीर करुन शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी.- गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य.
७० हजार हेक्टर शेती पडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:14 IST
आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.
७० हजार हेक्टर शेती पडिक
ठळक मुद्देरोवणी न झाल्याले शेतजमिनीचे पंचनामे करा : शेतकरी दुष्काळाच्या छायेत