शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

७ हजार ७७९ घरकुलांना मंजुरी

By admin | Updated: May 24, 2015 01:37 IST

सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. ..

गोंदिया : सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. सुरक्षित निवारा असणे ही मानवाची मुलभूत व महत्वपूर्ण गरज आहे. वर्ष २०१४-१५ या वर्षाकरिता इंदिरा आवास योजनेंतर्गत ७ हजार ७७९ कुटुंबांना घरकुलासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ऊन, वारा, थंडी व पावसापासून संरक्षण देणारे हक्काचे घर असावे. हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते व कुटुंबीयांना सुरक्षित जीवन देण्याचे ध्येय असते. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा दारिद्र्यरेषेखालील बेघर कुटुंबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देणारी इंदिरा आवास योजना शासनाद्वारे राबविण्यात येते. जिल्ह्यात ग्रामीण भागात एकूण २ लाख ५१ हजार ४८३ कुटुंबे आहेत. यापैकी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची संख्या १ लाख ४४ हजार २४३ एवढी आहे. या कुटुंबांना निवाऱ्याकरिता ग्रामपंचायत निहाय बेघर कुटुंबाची कायम प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील ५८ हजार १२० कुटुंबाना इंदिरा आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध योजना व मागास भागांसाठी अनुदान निधी योजनेमार्फत १०० टक्के अनुदानावर लाभ देण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखाली कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्याचे राहणीमान उंचावले आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे दारिद्र्यनिर्मुलन करण्यासाठी, गावातील वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्या संस्था उभारण्यासाठी या संस्थेमार्फत गरजुंना वित्तीय संस्था पुरविणे, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा फायदा नागरिकांना विकासाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)