शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी वेळेत न पोहचल्याने ६ हजार डोस गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 05:00 IST

केंद्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.  दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. तर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनोंदणी करुन नागरिक लसीकरणाकडे पाठ : ग्रामीण भागात सर्वाधिक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. व्यापक जनजागृतीनंतर सुध्दा नागरिक लसीकरण केंद्रावर पोहचत नसल्याने मोठ्या प्रमाणात डोस वाया जात आहे. लसीकरणासाठी नागरिक वेळेत न पोहचल्याने आतापर्यंत तब्बल ६०५७ डोस वाया गेले आहे. केंद्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.  दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. तर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने ते लसीकरणासाठी केंद्रावर पोहचत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात लसींचे डोस वाया जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६०५७ डोस वाया गेले असून यात ३.१८ टक्के आहे. यात काेविशिल्डचे २७४१ (४.३२) टक्के व कोव्हॅक्सिनचे ३३०० डोस वाया गेले. हे डोस वाया गेले नसते तर एका गावातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. सध्या सर्व लसींचा तुटवडा आहे. अशात मोठ्या प्रमाणात डोस वाया जात असल्याचे बिकट चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर लसीकरण केंद्रावर पोहचत लसीकरण करुन घ्यावे, त्यामुळे डोस वाया जाणे टाळण्यास मदत होईल आणि अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होईल. ग्रामीण भागात अफवांचा बाजार - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड लसीकरणाला घेऊन बऱ्याच अफवा आहेत. त्यामुळे भीतीमुळे नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर पोहचत नसल्याचे चित्र आहे. कोरोना विरुध्द लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र असून नागरिकांनी बिनधास्तपणे लसीकरणासाठी पुढे येऊन लस घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आरोग्य विभागाने कळविले आहे. लसीकरणाला येणार गती - बुधवारी जिल्ह्याला १९ हजार २०० लसींचे डोस प्राप्त झाले. गुरुवारी या लसींचे सर्व केंद्राना वितरण करण्यात आले. शनिवारपासून जिल्ह्यातील १४० केंद्रावरुन लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. या सर्व केंद्रावर नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस