शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

५७ हजार ४७३ महिलांना नवदिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 00:13 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, गरजू, विधवा व परित्यक्ता महिलांना संघटीत करून त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचे काम करीत आहे.

सात तालुक्यात ४४६१ बचत गट : शिक्षण, संपत्ती व सत्तेतील सहभागासाठी माविमंचा पुढाकार नरेश रहिले  गोंदिया महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, गरजू, विधवा व परित्यक्ता महिलांना संघटीत करून त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचे काम करीत आहे. जिल्ह्याच्या सात तालुक्यातील ४२२ गांवांमध्ये आतापर्यंत ४ हजार ४६१ महिला बचत गट तयार करण्यात आले आहे. यातून ५७ हजार ४६३ महिलांना आधार देण्याचे काम होत आहे. माविमंच्या सहकार्याने महिला आता आत्मनिर्भर होत आहेत. तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) च्या माध्यमातून बचत गटाचे काम सुरू आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, राजनितिक सक्षमीकरण, विकासात महिलांचा सहभाग वाढविणे व उपजीविकाच्या साधनात वाढ करून कुटुंबाची आर्थिक मिळकत वाढविण्याच्या उद्देशातून ३८० ग्राम संस्था गठीत करण्यात आल्या आहेत. त्यातून विविध व्यवसायांची उभारणी करून स्वयंरोजगार साधला आहे. गोंदिया शहरात २५० बचत गट माविमंच्या माध्यमातून शहरातील गरीब कुटुंबाचा बचत गटात समावेश करण्यासाठी बचत गट तयार करणे, त्यांना सक्षम करणे, बचत गटांना मोठ्या गटांना जोडणे, सुक्ष्म आर्थिक पुरवठा, विमा सेवा व उपजीविकेच्या माध्यमातून आर्थिक स्तर सुधारण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. गोंदिया नगर परिषदअंतर्गत २५० स्वयंसहायता बचत गट तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. सन २००७ पासून सुरू तेजस्विनी अंतर्गत स्वयंसहायता बचत गट लोकसंस्था म्हणून गठीत करणे, सुक्ष्म कर्ज पुरवठा, उपजीविका, उद्योजकता विकास, महिला सक्षमीकरण व सामाजिक समानतेचे काम केले जात आहे.