नरेश रहिले - गोंदियाशेतकऱ्यांवर थकीत असलेल्या वीज बिलाचा भरणा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार २३६ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे बिलावरील व्याजाचे पैस माफ झाले आहे. या योजनेला आता मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.जिल्ह्यातील कृषी पंपासाठी विद्युत कनेक्शन घेणाऱ्या १२ हजार २५६ ग्राहकांवर पाच कोटी २६ लाख रूपये विज बिलाची थकबाकी होती. शेतकऱ्यांऱ्यावर थकीत असलेल्या बिलाचे व्याज ९५ लाख रूपये तर शासनाकडून भरली जाणारी रक्कम (डिपीसी) १० लाख ५१ हजार रूपये होती. शेतकऱ्यांवर विद्युत बिल थकीत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्यात आले. शेतकऱ्यांची पिके मरू लागली. यात शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. या योजनेची अंतिम मुदत आॅक्टोबर २०१४ पर्यंत होती. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत ५ हजार २३६ शेतकऱ्यांनी आपल्या थकीत बिलाचा भरणा या कृषी संजीवनी योजनेच्या माध्यामातून केला. या ५ हजार २३६ शेतकऱ्यांवर २ कोटी ५० लाखांची थकबाकी होती. यातील ४ लाख ९ हजार डीपीसी व ३४ लाख १० हजार रूपये शेतकऱ्यांचे माफ करण्यात आले. या शेतकऱ्यांनी १ कोटी २५ लाख रूपये विद्युत बिलाचा भरणा करून या योजनेचा लाभ घेतला. परंतु विद्युत बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांपैकी ५० टक्के शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ न घेतल्यामुळे महावितरणने पुन्हा या योजनेच्या मुदतीला वाढ देण्यात आली आहे.
५२३६ शेतकऱ्यांना मिळाला ‘कृषी संजीवनीं’चा लाभ
By admin | Updated: December 24, 2014 23:01 IST