शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

४४ हजार क्विंटल बियाणे लागणार

By admin | Updated: May 29, 2015 01:20 IST

खरीप हंगामाची शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. त्यासाठी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत.

गोंदिया : खरीप हंगामाची शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. त्यासाठी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत. मात्र सोबतच बियाणे आणि खतांची सोय करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशा विविध कंपन्यांनी शेतकऱ्यांवर जाळे टाकणे सुरू केले आहे. आपलेच बियाणे कसे चांगले आहे हे दाखवत विविध कंपन्या शेतकऱ्यांना खुणावत आहेत. मात्र कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता जागरूकपणे कसा निर्णय घ्यावा, याचे मार्गदर्शन कृषी विभागाने देणे सुरू केले आहे.यावर्षी जिल्ह्यात १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने भात हे मुख्य पिक असून ४४ हजार क्विंटल भात बियाणे लागण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तालुकानिहाय विक्री केंद्रावर ते उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांच्या अध्यक्षतेत आयोजित करून सर्व संबंधितांना कृषी निविष्ठा साठवणूक आणि विक्रीबाबत योग्य मार्गदर्शन करून निर्देश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करते वेळी अधिकृत कंपन्यांचे व अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करावे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. बियाण्यांच्या नियोजनात गोंदिया तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, तिरोडा तालुक्यात ४ हजार क्विंटल, आमगाव तालुक्यात ४ हजार क्विंटल, गोरेगांव तालुक्यात ३ हजार ५०० क्विंटल, सडक-अर्जुनी तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, सालेकसा तालुक्यात २ हजार क्विंटल, देवरी तालुक्यात ३ हजार क्विंटल असे एकूण ३० हजार क्विंटल भात बियाणे पुरवठ्याचे नियोजन महाबीजमार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांकडून १४ हजार क्विंटल पुरवठाचे नियोजन असून एकूण ४४,००० क्विंटल भात बियाणे उपलब्ध होणार आहे. आवश्यकतेनुसार पुरवठा होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)