शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

४.३५ कोटींचे कृषी साहित्य वाटणार

By admin | Updated: November 29, 2015 02:32 IST

शासन शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना राबविते, मात्र लालफितशाहीत योजना अडकून त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी बराच उशिर लागतो.

१,१६९ लाभार्थ्यांची निवड : आर्थिक वर्षात पहिल्यांदाच मिळणार योजनांचा लाभदेवानंद शहारे गोंदियाशासन शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना राबविते, मात्र लालफितशाहीत योजना अडकून त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी बराच उशिर लागतो. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविल्या जात असलेल्या कृषी साहित्य वाटप योजनेतून येत आहे. एप्रिल पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात तीन योजनांसाठी निधीच उपलब्ध नसल्यामुळे रखडलेल्या त्या योजना आता मार्गी लागत आहे. त्यासाठी ४.३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तिन्ही योजनांमध्ये कृषी साहित्यांच्या लाभासाठी जिल्ह्यातील १ हजार १६९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून एकूण ४ कोटी ३५ लाख रूपये उपलब्ध झाले. सदर रक्कम जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांना वाटपही करण्यात आली आहे. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या (एससी) एकूण ८९३ शेतकऱ्यांची निवड यात करण्यात आली आहे. यापैकी पहिल्यांदा ५०१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा निवड प्रक्रिया राबवून आणखी ३९२ शेतकऱ्यांना निवडण्यात आले. असे एकूण ८९३ मागास प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी साहित्यांचा लाभ देण्यात येणार आहे.याशिवाय आदिवासी क्षेत्रांतर्गत (टीएससी) येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी साहित्य देण्यासाठी २०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. आदिवासी क्षेत्रांतर्गत सालेकसा व देवरी हे दोन तालुके मोडत असल्याने तेथीलच शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला. यात सालेकसा तालुक्यातील ८३ व देवरी तालुक्यातील ११७ अशा एकूण २०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ७६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तालुक्यांचा समावेश असून गोंदिया तालुक्यातील ९, तिरोडा तालुक्यातील २१ व गोरेगाव तालुक्यातील ४६ अशा एकूण ७६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. सदर लाभार्थ्यांची निवड दोन वर्षांसाठी करण्यात येते. यावर्षी निवड झालेल्या सदर लाभार्थ्यांना मार्च २०१६ पर्यंत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समित्यांना दिवाळीपूर्वीच निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाचे दर करारपत्रक निर्गमित झाले आहे. शेतकऱ्यांनी मागणी केलेली औजारे व आर्थिक मर्यादा ५० हजार रूपये यानुसार चालू आर्थिक वर्षातच निवड झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.शासनाने मंजूर केलेला निधीशासनाने सदर तिन्ही योजनांसाठी एकूण ४ कोटी ३५ लाख रूपये मंजूर केले असून ते जिल्हा परिषदेमार्फत संबंधित पंचायत समित्यांना वाटपही करण्यात आले आहेत. यात विशेष घटक योजनेंतर्गत (एससी) अनुसूचित जातीसाठी २.८० कोटी रूपये, आदिवासी क्षेत्रांतर्गत (टीएससी) लाभार्थ्यांसाठी १.२५ कोटी रूपये व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत ३० लाख रूपयांचे वाटप संबंधित पंचायत समित्यांना करण्यात आले आहे.प्रतिलाभार्थी ५० हजारांचे कृषी साहित्यसध्याच्या चालू आर्थिक वर्षात प्रतिलाभार्थ्यास ५० हजार रूपयांचे कृषी साहित्य देण्यात येणार आहे. या साहित्यांमध्ये बैलजोडी, बैलगाडी, पंप संच, पाईपलाईन, धान उडवणी पंखे, स्प्रे पंप इत्यादी औजारांचा समावेश आहे. त्यासाठी पंचायत समित्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातून पंचायत समित्यांमार्फत कृषी साहित्य खरेदी करून देण्याची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.