शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वर्षभरात ३९१ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:32 IST

आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे.

ठळक मुद्दे‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान अपयशी : मागील वर्षीच्या तुलनेत अर्भक व बाल मृत्यूदरात वाढ

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे. बालमृत्यूच्या आकडेवारीने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले ‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये नवजात व बालमृत्यू ३३८ होते. सन २०१७-१८ मध्ये ही आकडेवारी ३९१ च्या घरात गेली. गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यू दर राज्याच्या बालमृत्यू दरापेक्षा कमी असला तरी ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव व सालेकसा तालुक्यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तिरोडा व सडक-अर्जुनी या तालुक्यातील आकडेवारी स्थिर आहेत. आमगाव, देवरी व अर्जुनी-मोरगाव मधील आकडेवारी कमी आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये १६ हजार ६०७ प्रसूती झाल्या. यात १६ हजार ४९० सुदृढ बालके जन्माला आली. नवजात मृत्यू दर २०.५० टक्के होता. तर सन २०१७-१८ या वर्षात १७ हजार ९०० प्रसूती झाल्या. यात १७ हजार ६१६ सुदृढ बालकांनी जन्म घेतला. या वर्षातील बाल मृत्यूदर २२.२० आहे. ग्रामीण भागातील बालमृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. परंतु बालमृत्यू प्रकरणात शहरी भागाने ग्रामीण भागालाही मागे टाकले आहे. जन्माला आल्यापासून वर्षभराच्या आतील बालकांचा मृत्यूदर मागच्या वर्षी कमी होता.त्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये ५२२, सन २०१४-१५ मध्ये ४८५, सन २०१५-१६ मध्ये ३२० बालकांचा मृत्यू झाला.सन २०१६-१७ मध्ये ३३८ तर सन २०१७-१८ मध्ये ३९१ बालकांचा मृत्यू झाला आहे.शहरात ५८.३१ टक्के बालमृत्यूजिल्ह्याच्या शहरी भागात सन २०१६-१७ मध्ये ५७.३९ टक्के तर सन २०१७-१८ मध्ये ५८.३१ टक्के नवजात व बालकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ५० टक्क्याच्या जवळील बालमृत्यू एस्फेक्सिया, सेप्सिस, निमोनिया व कमी वजनामुळे होतात. तर नवजात बालकांचा इतर आजारानेही मृत्यू होतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल