शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

३८१ कर्मचाऱ्यांची ‘लेखणी बंद’

By admin | Updated: July 17, 2016 00:18 IST

चौथ्या वेतन आयोगापासून लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांवर वेतन तफावतीचा अन्याय होत आहे. यावर शासनाने अद्याप तोडगा काढलेला नाही.

सर्वसामान्यांना फटका : जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प भंडारा : चौथ्या वेतन आयोगापासून लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांवर वेतन तफावतीचा अन्याय होत आहे. यावर शासनाने अद्याप तोडगा काढलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी आजपासून लेखनी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यात जिल्ह्यातील ३८१ लिपीकवर्गीय कर्मचारी सहभागी झाले आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला व त्यांना आल्या पावली परतावे लागले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी हा बेमुदत लेखनी बंद पुकारण्यात आलेला आहे. लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना १९८६ च्या चौथ्या वेतन आयोगापासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांना अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात तथाफवत निर्माण होत आहे. याबाबत कर्मचारी संघटनेने अनेकदा ग्रामविकास मंत्र्यांकडे कैफियत मांडली. मात्र, केवळ आश्वासन देवून त्यांना खाली हाताने परतवीले. यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज शुक्रवारपासून राज्यभर बेमुदत लेखनी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील ३८१ लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामुळे आज महसुल विभाग वगळता जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व लिपीकवर्गीय कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाले आहे. यामुळे येथील कामकाम आज दिवसभर ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची कल्पना सर्वसामान्यांना नसल्याने शासकीय कामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत आलेल्या ग्रामीणांना आल्यापावली परतावे लागले. दरम्यान, संपात सहभागी कर्मचारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदच्या आवारात एकत्र आले. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करून घोषणाबाजी करून कामकाजावर बहिष्कार टाकला. यावेळी संघटनेचे केसरीलाल गायधने, प्रभु मते, दिलीप सोनुले, मनिष वाहने यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनाला अभियंता संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, अ.भा.शिक्षक संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी युनीयनने पाठिंबा दिला. या मागण्यांसाठी दिला लढा लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणीत सुधारणा करणे, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करणे, लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यसुची निश्चित करून मिळणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांप्रमाणे लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सर्व स्तरावर नि:शुल्क शिक्षण सवलत मिळणे, वाहनचालकाप्रमाणे लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना अतिकालीक भत्ता मिळणे, पदोन्नतीधारकास वरिष्ठ पदाचे किमान मुळवेतन मिळणेसाठी अधिसुचनेत सुधारणा करणे, एमपीएससी परीक्षेसाठी ४५ वर्षवयोमर्यादेपर्यंत सवलत मिळणे, जुनीच सेवानिवृत्ती वेतन योजना चालु करावी, आरोग्य केंद्रात सहाय्यक प्रशासन पद तयार करावे, पदविधर लिपीकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी. लेखणी बंदमध्ये यांचा सहभाग लिपीकवर्गीय लेखनी बंद आंदोलनात चतुर्थ कर्मचारी, तांत्रिक वर्ग कर्मचारी व विभाग प्रमुख व महसूल विभागाचे कर्मचारी यांचा सहभाग नाही. या आंदोलनात अधिक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक व कक्ष अधिकारी यांचा सहभाग आहे. यात जिल्हा परिषद (मुख्यालय) येथील १४५ कर्मचाऱ्यांसह भंडारा पंचायत समितीमधील ३१, साकोली ३८, लाखनी २९, पवनी ३१, तुमसर ४१, लाखांदूर ३० व मोहाडी पंचायत समितीमधील ३६ अशा जिल्ह्यातील ३८१ लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे.