शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात ३८ हजार ८१४ प्रवासी वाढले

By admin | Updated: June 16, 2016 02:19 IST

शाळेच्या सुट्या, लग्नसराई, उन्हाळी पर्यटन यामुळे उन्हाळ्याच्या उकाड्यातही रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावल्या.

गतवर्षाची तुलना : ४८ लाख ३१ हजार ३६५ रूपयांची रेल्वेच्या उत्पन्नात भरगोंदिया : शाळेच्या सुट्या, लग्नसराई, उन्हाळी पर्यटन यामुळे उन्हाळ्याच्या उकाड्यातही रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावल्या. यावर्षी एप्रिल व मे महिन्यांच्या सुट्यात गेल्यावर्षीपेक्षा प्रवासी संख्या वाढली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत रेल्वेला या दोन महिन्यात ४८ लाख ३१ हजार ३६५ रुपये अधिकचे उत्पन्न मिळाले.बाहेरगावच्या प्रवासासाठी सर्वात स्वस्त व चांगले माध्यम म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. यावर्षी एप्रिल महिन्यात मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत दोन हजार ८६० व मे महिन्यात ३५ हजार ९५४ अधिकच्या संख्येने प्रवाशांनी रेल्वे गाडीने प्रवास केला. त्यामुळे एप्रिल महिन्यात २७ लाख ९५ हजार ४५३ रूपये व मे महिन्यात २० लाख ३५ हजार ८१२ रूपयांचे अधिकचे उत्पन्न गोंदिया रेल्वे स्थानकाला तिकीट विक्रीतून झाले. एकूण ४८ लाख ३१ हजार ३६५ रूपयांचे अधिकचे उत्पन्न दोन्ही महिन्यांत तिकीट विक्रीतून झाले आहे. मे २०१५ मध्ये एकूण ६ लाख ४३ हजार ७६० तिकिटे गोंदिया रेल्वे स्थानकातून विक्री झाले. तर एप्रिल २०१६ मध्ये तिकीट विक्रीची संख्या वाढून ६ लाख ४६ हजार ६२० झाली. (प्रतिनिधी)