शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आढळले ३५ सारस

By admin | Updated: June 20, 2016 01:31 IST

गोंदिया निसर्ग मंडळ, नागझिरा फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन, वनविभाग तसेच वन्यजीव विभाग यांच्या सहकार्यातून ....

भंडारात २ तर बालाघाटमध्ये ४५ : तीन दिवस चालली सारस गणना गोंदिया : गोंदिया निसर्ग मंडळ, नागझिरा फाऊंडेशन, जिल्हा प्रशासन, वनविभाग तसेच वन्यजीव विभाग यांच्या सहकार्यातून जिल्ह्यात तीन दिवस सारस गणनेचा कार्यक्रम घेण्यात आला. यात जिल्ह्यात ३५ सारस आढळले आहेत. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात दोन तर लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाटमध्ये ४५ सारस टिपण्यात आले आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेला जलसंपन्न असलेला तलावांचा आणि धानाचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्ह्यात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळे असून जिल्ह्यात असलेल्या माजी मालगुजारी तलावावर विविध प्रजातींचे स्थलांतर करु न विदेशी पक्षी जिल्ह्यात दाखल होतात. सारस हा पक्षी म्हणजे जिल्ह्याचे वैभव असून राज्यात केवळ गोंदिया जिल्हयातच सारस पक्ष्यांचे अस्तित्व आहे. सारस हा स्थानिक पक्षी असून मोठा, उंच व रुबाबदार असलेला सारस ऐश्वर्य संपन्न आहे. या पक्षाला बघण्यासाठी अनेक पर्यटकांची पाऊले आता जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या काठाकडे वळली आहेत. विशेषत: परसवाडा, झिलमिली, नवेगावबांध, झालिया, बाघनदीचा किनारा यासह अन्य तलावांच्या काठावर सारस पक्षी आढळून येतात.सारसांची नेमकी संख्या जिल्ह्यात किती असेल या दृष्टीने नुकतीच तीन दिवस सारस पक्ष्यांची गणना करण्यात आली. मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार तसेच सारस संरक्षण प्रकल्प प्रभारी विश्वदयाल गौतम यांच्या मार्गदर्शनात ही सारस गणना पारंपरिक तसेच शास्त्रीय पध्दतीने करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)५० निसर्ग मित्रांनी घेतला सहभाग तीन दिवस चाललेल्या या सारस गणनेत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील एकूण ५० ठिकाणी १७ चमूतील जवळपास ५० ते ५५ निसर्गमित्रांनी सारस गणना केली. या गणनेत मुनेश गौतम, सावन बहेकार, अविजीत परिहार, दुष्यंत रेभे, राहुल हारोडे, सुनील धोटे, भरत जसानी, अभय कोचर, शशांक लाडेकर, बबलू चुटे, सलिम शेख, प्रवीण मेंढे, जयू खरकाटे, जयपाल ठाकूर, रितेश अग्रवाल, राहूल भावे, प्रशांत मेंढे, दानवीर मस्के आदी ५० जणांनी सहभाग घेतला.