शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

२७५ पर्यटकांनी केली जंगल सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:00 IST

माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत आहे. यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे.

ठळक मुद्देनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : ५० हजार रूपयांचा मिळाला महसूल

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील ८ महिन्यापांसून बंद असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अखेर रविवारपासून (दि.१) पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. यामुळे पहिल्याच दिवशी सोमवारी तब्बल २७५ पर्यटकांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगलसफारी केली. यातून वन विभागाला ४९ हजार ५५० रूपयांचा महसूल मिळाला आहे.माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत आहे. यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे.जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते.मात्र आता अनलॉक अंतर्गत सोमवारपासून (दि.१) प्रकल्पाला पर्यटनासाठी खुले करण्याची परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी तब्बल २७३ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगलसफारी केली.१० वर्षाखालील १० मुलांचा समावेशव्याघ्र प्रकल्पाला परवानगी दिली जात असतानाच १० वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्यात बदल करून १० वर्षांखालील मुलांच्या प्रवेशास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, सोमवारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या २७५ पर्यटकांमध्ये १० वर्षाखालील १० मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. यावरून लहान मुलांनाही वन पर्यटनाची ओढ दिसून येत असून शासनाचा हा निर्णय लहान मुलांसाठी फायद्याचाच ठरल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.चोरखमारा गेटलाच पसंतीव्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुले होताच सोमवारी २७३ पर्यटकांनी भेट दिली असून यासाठी ६४ वाहनांनी प्रकल्पात प्रवेश केला आहे. यात, सर्वाधिक १९ वाहनांनी चोरखमारा गेटने प्रवेश केला असून ८३ पर्यटकांचा त्यात समावेश आहे. यामुळे या गेटवरून १५ हजार २०० रूपयांचा महसूलही वन विभागाला मिळाला. हे बघता, चोरखमारा गेटलाच पर्यटक जास्त पसंती दाखवित असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्यNagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्प