शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

२५८३ गोंदियाकरांनी तोडला नियम, भरलाही नाही दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

गोंदिया : वाहतूक सुरळीत रहावी यासाठी शासनाने वाहतुकीचे नियम आखून दिले आहेत. हे नियम स्वत:सह पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी असतानाही ...

गोंदिया : वाहतूक सुरळीत रहावी यासाठी शासनाने वाहतुकीचे नियम आखून दिले आहेत. हे नियम स्वत:सह पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी असतानाही कित्येकांकडून नियमांची मोडतोड केली जाते. अशात वाहतूक नियंत्रण विभागाला नियमांना तिलांजली देणाऱ्यांना दंड स्वरूपात दणका देण्याची तरतूद आहे. शहरातही अशा नियम मोडणाऱ्या बहाद्दरांची कमी नाही. सन २०२०मधील आकडेवारी बघतिल्यास येथील वाहतूक नियंत्रण शाखेने अशा नियम मोडणाऱ्यांचा दंडाचा दणका दिला असला तरीही त्यातील २५८३ बहाद्दरांनी पाच लाख ८२ हजार २००रुपये दंडाचा भरणा केलेलाच नाही.

सन २०२० हे वर्ष कोरोनाने ग्रासूनच सोडले होते. वर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊन लागले व त्या काळात कठोरतेने नियमांचे पालन करण्याची पाळी आली होती. अशात वाहतूक नियंत्रण शाखेने लॉकडाऊन नियमांचे पालन करीत वाहनचालकांवर कारवाया करीत दोन्ही बाजू सांभाळून घेतल्या. अशातच वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२०मध्ये विविध कलमांतर्गत केलेल्या ३७,१५४ कारवायांत ७७ लाख २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर २५८३ कारवायांत पाच लाख ८२ हजार २०० रुपयांचा दंड अद्याप भरणा करण्यात आला नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, वाहतूक नियंत्रण शाखेेने विविध कलमांतर्गत या कारवाया केल्या असून, यातील काही कारवायांत लगेच दंडाची रक्कम वसूल केली जाते. मात्र कलमांतर्गत नंतर दंड भरण्याची तरतूद असल्याने त्याचा फायदा या बहाद्दरांनी घेतला आहे.

-------------------------

तरतूदच नाही...

दंड न भरल्याने वाहन परवाना रद्द करण्याची तरतूदच नसल्याने जिल्ह्यात अशी कारवाई करण्यात आलेली नाही, तर ज्यांना दंड ठोठावण्यात आला असूनही त्यांनी दंड भरला नाही असे पुढे वाहतूक नियंत्रण शाखेच्या हाती आल्यास त्यांच्याकडून जुना दंडही वसूल केला जातो. यामुळे नियम तोडून ते दंडापासून वाचू शकत नाही.

-----------------------------

वाहतुकीचे नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. यामुळे वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम तोडल्याचा फटका कित्येकदा जिवावर बेततो. आपले जीवन अमूल्य आहे यामुळे नियमांचे पालन करा. कारण घरी तुमची वाट बघणारे आहेत.

- दिनेश तायडे

निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

------------------------------------

- नो पार्किंग - १८५ (पेड) - २५ (अनपेड)

- धोकादायक वाहन - ४०- ६

- ट्रिपलसीट- १४२२-१००

-विनापरवाना २८०८०- ३००

- मोबाइलवर बोलणे - २९६-१२

- अधिक वेग - ७४- ४