शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

देयक भरणातून मिळाले २.५४ कोटी

By admin | Updated: November 18, 2016 01:45 IST

राज्य शासनाच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देयकांच्या भरणासाठी ५०० व १००० रूपयांची नोट स्वीकारण्यात येत आहे.

महावितरणला सुखद शॉक : १७ ग्राहकांनी भरली थकबाकी गोंदिया : राज्य शासनाच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देयकांच्या भरणासाठी ५०० व १००० रूपयांची नोट स्वीकारण्यात येत आहे. यात महावितरणला १० ते १४ या कालावधीत दोन कोटी ५४ लाख रूपयांची आवक झाली आहे. महावितरणसाठी हा सुखद शॉक असून जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी आणखी २४ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने महावितरणच्या तिजोरीत आणखीही भर पडणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ५०० व १००० रूपयांच्या नोटबंदीने अवघ्या देशातच खळबळ माजली आहे. अशात ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ५०० व १००० नोटा आहेत, त्यांची या नोटा खर्च करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र जुन्या नोटांचा व्यवहार सामान्य व्यापारी करीत नसल्याने पंचाईत अधीक वाढली आहे. अशात राज्य शासनाने कर व देयकांचा भरणा करण्यासाठी नागरिकांना सुविधा देत ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश काढले. शासकीय कार्यालयांसाठी हे आदेश बंधनकारक असतानाच महावितरणकडूनही जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. यातून महावितरणला गोंदिया जिल्ह्यात दोन कोटी ५४ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात १७ हजार ५२३ ग्राहकांनी १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान ही रक्कम भरली आहे. विशेष म्हणजे यात ११ तारखेला सर्वाधीक एक कोटी १२ लाख रूपयांचे उत्पन्न महावितरणला मिळाले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या आदेशावरून ५०० व १००० रूपयांच्या नोटा येत्या २४ तारखेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरणच्या तिजोरीत या कालावधीत आणखीही भर पडणार यात शंका नाही. (शहर प्रतिनिधी)कर्मचारी पोहोचले थकबाकीदारांकडेयेत्या २४ तारखेपर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. उरलेल्या अवधीत नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे वीज कंपनीचे कर्मचारी थकबाकीदारांकडे जात असून या संधीचा लाभ घेऊन वीज देयक भरून थकबाकीमुक्त व्हावे यासाठी थकबाकीदारांंना पे्ररीत करीत आहेत. शिवाय वीज देयक भरण्यासाठी येणाऱ्या थकबाकीदारांच्या सुविधेसाठी वीज कंपनीचे कर्मचारी वीज देयक भरणा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची मदत करीत आहेत.