शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

२४ गोंदियाकरांनी काढले इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST

गोंदिया : बदलत्या काळानुसार आता परदेशवारी करणे अत्यंत सोपी बाब झाली असून देशातील कित्येक नागरिक आता फिरण्यासाठी म्हणूनही परदेशात ...

गोंदिया : बदलत्या काळानुसार आता परदेशवारी करणे अत्यंत सोपी बाब झाली असून देशातील कित्येक नागरिक आता फिरण्यासाठी म्हणूनही परदेशात जाऊन येतात. फिरण्यासाठी जाणाऱ्यांना काहीच दिवसांसाठी जावयाचे असल्याने ते काही दिवसांचा व्हीसा घेतात व परत येतात. मात्र, आता कित्येक भारतीयांचे परेदशातही उद्योगधंदे असून ते आपल्या कामानिमित्त कित्येक दिवसांसाठी परदेशात मुक्कामी जातात. याशिवाय शिक्षणासाठीही देशातील कित्येक विद्यार्थी परदेशात जात असून त्यांचा कित्येक वर्षांचा मुक्काम तेथेच असतो. अशात या उद्योगपती तसेच विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. त्यांच्या सोयीसाठी आता येथूनच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात आहे. यामुळे अशा व्यक्ती आता येथूनच हे लायसन्स घेऊन परदेशात जात आहेत. यासाठी त्यांना संबंधित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मागणी करावी लागते. जिल्ह्यातील अशा २४ व्यक्तींनी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून मागील ६ वर्षांत इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली आहे.

----------------------------------

मुदत एक वर्षाची

- सामान्यत: इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत एक वर्षाची असते. कारण बहुतांश व्हीसा एक वर्षासाठी दिला जातो. अशात संबंधित व्यक्तीचा व्हीसा संपल्यास लायसन्सचीही मुदत संपते.

- याशिवाय काही व्यक्ती जास्त कालावधी किंवा शिक्षणासाठी जात असल्याने एक वर्षानंतर पाच वर्षांसाठी किंवा त्यांचा व्हिसा कधी संपतो यानुसार त्यांना लायसन्स दिले जाते.

------------------------

ही लागतात कागदपत्रे

इंटरनॅशनल ड्रायव्हि्ंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येथील ड्रायव्हिंग लायसन्स, एक हजार रुपये फी, ३ पासपोर्ट आकाराचे फोटो, मेडिकल सर्टीफिकेट, संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट तसेच मिळालेल्या व्हिसाचा पुरावा सादर करावा लागतो. त्यानुसार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून संपूर्ण प्रक्रिया करून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. शिवाय संबंधित व्यक्ती किती कालावधीसाठी परदेशात जात आहे हे बघून त्यांना लायसन्स दिले जाते.

-------------------------

कोट

सामान्यत: जास्त कालावधीकरिता परदेशात राहण्यासाठी जाणाऱ्यांकडूनच इंटरनॅशनल ड्रायव्हि्ंग लायसन्सची मागणी केली जाते. यात ज्यांचे परदेशात उद्योगधंदे वा नोकरी आहे किंवा शिकण्यासाठी जात असलेल्यांकडूनच मागणी आहे. विशेष म्हणजे, यातही ज्यांची आर्थिक स्थिती बरी आहे त्यांच्याकडूनच इंटरनॅशनल ड्रायव्हि्ंग लायसन्सची मागणी केली जाते. जिल्ह्यात मागील ६ वर्षांत २४ प्रकरणेच आली असून आपल्या जिल्ह्यासाठी ही बाब अत्यल्पच आहे.

- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया

-----------------------

किती जणांनी काढले इंटरनॅशनल ड्रायव्हि्ंग लायसन्स

२०१६- ४

२०१७- ४

२०१८- ३

२०१९ ५

२०२०- ५

२०२१- ३