शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

२३५ शिक्षकांनी घेतली नाही लस; मुले शाळेत पाठवायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

गोंदिया : शाळा सुरू करण्याची लगबग शासन करीत आहे. शाळा सुरू झाली तरी लसीकरण न झाल्याने कोरोनाचा संसर्ग ...

गोंदिया : शाळा सुरू करण्याची लगबग शासन करीत आहे. शाळा सुरू झाली तरी लसीकरण न झाल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. तेव्हाच शाळा सुरू केल्या जातील. यासाठी आता सरकारने शिक्षकांना ५ सप्टेंबरपर्यंत लसीकरण करून घ्या, अशा सूचना केल्या होत्या. तरीदेखील जिल्ह्यातील २३५ शिक्षकांनी लस घेतली नाही.

गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत एकूण ३८२९ शिक्षक असून, यापैकी ३७१५ शिक्षकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ११४ शिक्षकांनी अजूनही पहिला डोस घेतला नाही. दुसरा डोस घेणारे ३६२३ शिक्षक असून, २०६ शिक्षकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे ३५४४ लोकांपैकी ३४२३ लाेकांचे लसीकरण झाले असून, १२१ लोकांचे अद्याप लसीकरण झाले नाही. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन विभागांतील २३५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप झाले नाही. सर्व शिक्षकांना शाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण गरजेचे आहे.

..........................

लस न घेणाऱ्यांवर शासनानुसार कारवाई

लसीकरण केल्याशिवाय शिक्षकांनी किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत जाऊ नये. शासनाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यास सांगितले आहे. वेळेच्या आत शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.

— प्रदीप समरीत, उपशिक्षणाधिकारी गोंदिया

..................

जिल्ह्यातील एकूण शिक्षक-७३७३

प्राथमिक विभाग

-पहिला डोस घेतलेले- ३,७१५

दोन्ही डोस घेतलेले- ३,६२३

लस न घेतलेले- २०६

----माध्यमिक विभाग-----

-पहिला डोस घेतलेले- ३,४२३

दोन्ही डोस घेतलेले- ३,२३३

लस न घेतलेले- १२१

...................

अनेक शिक्षक करतात दुर्लक्ष

शाळा सुरू नसल्याने लस घेण्यासाठी काही शिक्षक दुर्लक्ष करीत आहेत. काही शिक्षकांना जुना आजार असल्याने ते आपली औषध सुरू असल्याचे सांगून लस घेण्यास टाळतात. काही लोक डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस घेऊ असे म्हणतात. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी दोन्ही लसींचे डोस घेणे घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही लसीकरणासंदर्भात पाहिजे तेवढा गंभीर नाही.