शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत मलेरियाचे २३३ रूग्ण

By admin | Updated: May 24, 2015 01:36 IST

जिल्ह्यात डासांचा प्रकोप काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातही अविकसीत भागांत मलेरियाने आजही दहशत पसरवून ठेवली आहे.

दरेकसा व घोनाडी संवेदनशील : मागील वर्षीच्या तुलनेत रुग्ण वाढलेगोंदिया : जिल्ह्यात डासांचा प्रकोप काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातही अविकसीत भागांत मलेरियाने आजही दहशत पसरवून ठेवली आहे. त्यामुळेच यंदा चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २३३ मलेरिया रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र व देवरी तालुक्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील आकडेवारी चिंतेचे कारण बनली आहे. मागील चार महिन्यांतील आकडेवारी बघितल्यास, मलेरिया रूग्णांची संख्या २३३ वर पोहचली आहे. सन २०१४ च्या आकडेवारीशी तुलना केल्यास यंदा मलेरिया रूग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. कारण सन २०१४ च्या सुरूवातीच्या चार महिन्यांत १६१ रूग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा ७२ रूग्ण जास्त आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या सुरूवातीच्या चार महिन्यांत नोंद करण्यात आलेल्या २३३ रूग्णांत १०५ रूग्ण दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मिळाले आहेत. तर घोनाडी आरोग्य केंद्रातील २८ रूग्ण आढळून आले आहेत. मलेरियाच्या दृष्टीने जिल्ह्यात दरेकसा व घोनाडी हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र संवेदनशील मानले जातात. कारण मागील वर्षांपासून जिल्ह्यात मलेरियाचे जास्त रूग्ण या दोन आरोग्य केंद्रांतूनच आढळून येत असल्याचे जिल्हा मलेरिया विभागाच्या आकेडवारीवरून दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)१.१८ लाख संशयितांची रक्त तपासणी मागील वर्षी जानेवारी महिन्यात ४१, फेब्रुवारी महिन्यात २८, मार्च महिन्यात ६२ व एप्रिल महिन्यात ३० मलेरियाचे रूग्ण आढळून आले होते. यंदा जिल्ह्यात जानेवारी महिन्यात १०९, फेब्रुवारी महिन्यात ४३, मार्च महिन्यात ३२ व एप्रिल महिन्यात ४७ मलेरियाचे रूग्ण मिळून आले आहेत. यावरून जिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच यंदा जानेवारी महिन्यात २७ हजार ५९८, फेब्रुवारी महिन्यात ३० हजार ५०८, मार्च महिन्यात ३१ हजार ५२५ तर एप्रिल महिन्यात २८ हजार १९५ अशाप्रकारे एकूण एक लाख १७ हजार ८२६ जणांची रक्त तपासणी करण्यात आली आहे. १ जूनपासून फवारणी मोहीम पावसाळ््यात डासांचा प्रकोप वाढत असल्याने त्यादृष्टीने येत्या १ जूनपासून मलेरिया विभागाकडून जिल्ह्यात डासनाशक फवारणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत जिल्ह्यातील २४० गावांत डासनाशक फवारणी होणार असल्याचे जिल्हा मलेरिया विभागाचे निरीक्षक डॉ.सलील पाटील यांनी सांगितले.