शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीत येणार २३२ प्रस्ताव

By admin | Updated: June 3, 2016 01:38 IST

तेव्हापर्यंत ....

पती-पत्नी एकत्रीकरणाचे ३७ : केवळ १५ प्रस्तावांना मिळाली मंजुरीगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु बिंदुनामावलीचे काम होत नाही तेव्हापर्यंत कोणत्या संवर्गातील किती पदे रिक्त आहेत याची माहिती अधिकारी स्पष्ट करू न शकल्यामुळे आंतरजिल्हा बदलीची काही प्रकरणे थांबली आहेत. जिल्ह्यातून बाहेर जाणारे ६२ प्रस्ताव असून जिल्ह्यात येण्यासाठी २३२ प्रस्ताव आहेत. संचमान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या राज्यात वाढत आहे. गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत अनेक शाळांमध्ये अनेक विषयाचे शिक्षक नव्हते. संचमान्यतेमुळे ४९० अतिरिक्त शिक्षक होते. त्यापैकी ४६० शिक्षकांचे विषय शिक्षक म्हणून समायोजन झाले. मागील पाच वर्षापासून विषय शिक्षक नसल्याची ओरड होती. शासनाच्या संचमान्यता या धोरणामुळे अतिरिक्त शिक्षक होत आहेत. त्यामुळे राज्यातील सात हजाराच्या घरात शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचे प्रकरण निकाली काढण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आस्थापनेवर असलेले ६२ शिक्षक आंतरजिल्हा बदलीत जिल्हा सोडून जाण्यास तयार आहेत. परंतु जिल्ह्यात येण्यासाठी २३२ शिक्षकांचे प्रस्ताव आहेत. संचमान्यतेमुळे ५१ शिक्षक आताही अतिरिक्त आहेत. परंतु लवकरच ही समस्या सुटणार आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी आलेल्या ६२ पैकी १५ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. काही प्रस्तावात तृट्या आहेत, त्या पुर्ण करण्याची प्रक्रिया कार्यालयाकडून सुरू आहे. आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून आपसात आंतरजिल्हा बदलीचे १२ प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. समायोजन झाले, विषय शिक्षकांची नियुक्ती झाली, पदोन्नती पुढे आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे अतिरिक्त असलेल्या ५१ शिक्षकांचा प्रश्न लवकरच सुटत आहे. शासनाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात या संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव पडून आहेत. मात्र त्यांना दिलासा मिळालेला नाही.प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली प्रवर्ग निहाय जागा किती आहेत याची माहिती काढण्यात येणार आहे. बिंदुनामावलीनंतर प्राधान्यक्रमाने सेवाजेष्ठतेनुसार सर्व पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)