शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२.५५ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे, हे एकच उद्दिष्ट बाळगून शासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार, ...

गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे, हे एकच उद्दिष्ट बाळगून शासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार, जिल्हा प्रशासनानेही कंबर कसली असून, जिल्ह्यात १०० लसीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचेच फलीत असे की, जिल्ह्यात बुधवारपर्यंत (दि.९) एकूण २९३१४६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. याची २२.५५ एवढी टक्केवारी आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ४५-६० वयोगटातील नागरिकांचीच सरशी आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशात कहर केला आहे. कित्येक कुटुंब उद्‌ध्वस्त करणाऱ्या या लाटेमुळे झालेली हानी कधीही भरून काढता येणार नाही. अशात आता तिसऱ्या संभाव्य लाटेबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत; मात्र आता कोरोनाला यापुढे पाय पसरू द्यायचे नसेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. यामुळेच आता शासन लसीकरणावर जोर देत असून, लसीकरणाची एक चळवळच देशात चालविली जात आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरणासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू असून, यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.

या प्रयत्नांचे फलीत असे की, बुधवारपर्यंत (दि.९) जिल्ह्यात २९३१४६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ४५-६० वयोगटातील १३५२५० नागरिकांनी लस घेतली असून, त्यानंतर ६० वर्षांवरील वयोगटातील ९३३२९ नागरिकांनी लस घेतली आहे. यानंतर आता जिल्ह्यात २२.५५ टक्के लसीकरण झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी आता गावागावांत शिबिरे व जनजागृती केली जात असल्याने नागरिकांच्या मनातील भीती व भ्रम निवळून ते लसीकरणासाठी पुढे येत आहेत.

-----------------------------

पहिला डोस १७.३० तर दुसऱ्या डोसची ५.३० टक्केवारी

जिल्ह्यात लसीकरणासाठी वेगवेगळे प्रयोग करून लसीकरणाला घेऊन नागरिकांच्या मनातील भीती व भ्रम दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशात गावागावांत शिबिरे घेतली जात आहेत. परिणामी ग्रामीण भागातील जनता आता कोठे लसीकरणासाठी पुढे येत आहे. अशात जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांची १७.३० एवढी टक्केवारी असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची ५.३० एवढी टक्केवारी आहे.

-------------------------------

आता लक्ष १८- ४४ वयोगटाकडे

जिल्ह्यात लसीकरणाला आता वेग येत असताना दिसत असून, ही चांगली बाब आहे; मात्र पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही, असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, १८-४४ वयोगटातील एक मोठा गट लसीकरणापासून वंचित आहे. मध्यंतरी काही मोजक्या दिवसांत या गटासाठी झालेल्या लसीकरणात १३०२१ जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे येत्या २१ तारखेपासून या गटाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर नक्कीच झपाट्याने लसीकरणाची टक्केवारी वाढणार, यात शंका नाही.