शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१९३ डिजिटल शाळांची बत्तीगुल

By admin | Updated: July 8, 2017 00:42 IST

शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस,

पुढे पाठ मागे सपाट : बील न भरल्याने अनेक शाळांचा विद्युत पुरवठा खंडित नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, वाचन कुटी, दप्तर विरहित दिन असे विविध उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या; मात्र १९३ शाळांमध्ये विद्युत नसल्याने डिजिटल शाळा फक्त नावापुरत्याच की देखाव्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ६९ शाळा आहेत. या सर्व शाळा शिक्षण विभागाने लोकसहभागातून डिजिटल केल्या आहेत. परंतु शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीत आतापर्यंत २१ शाळांमध्ये विद्युत कनेक्शनच नाही. विद्युत कनेक्शन घेतलेल्या ज्या शाळांचा बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला, त्या शाळांची संख्या १७२ आहे. ज्या शाळांत विद्युतचीच सोय नाही त्या शाळांचतील संगणक निकामी आहेत. त्या शाळांना डिजिटल करण्यासाठी शेजारच्या घरातून उद्घाटनापूर्तीच वीज वापरली. जिल्ह्यातील आमगावच्या ८९, अर्जुनी मोरगाव १३३, देवरी १०१, गोंदिया १६३, गोरेगाव ९०, सडक-अर्जुनी १०२, सालेकसा ६२ व तिरोडा १३६ शाळांत विद्युतची सोय आहे. जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये विद्युत कनेक्शनच नाहीत. ज्या शाळांमध्ये संगणक आहेत ते विद्युतअभावी निकामी पडले आहेत. यात अर्जुनी-मोरगाव २, देवरी ८, गोंदिया १, गोरगाव १, सालेकसा ७ व तिरोडाच्या २ शाळांचा समावेश आहे. सादीलवार राशीअभावी बिल भरले नाही शाळेच्या उत्थानासाठी शासनाने मागील अनेक वर्षांपासून सादीलवार राशी न दिल्यामुळे शाळेच्या विद्युत कनेक्शनचे बिल मुख्याध्यापकांनी भरले नव्हते. परिणामी त्या शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. शासनाकडून अत्यल्प निधी दिला जात असल्याने विद्युतचा खर्च सांभाळने कठिण होत आहे. शाळांना विद्युत पुरवठा करण्यात येणाऱ्या बिलाची रक्कम व्यापार दरात लावली जाते. परंतु शाळांना देण्यात येणारे बिल घरगुती वापराच्या दरात लावल्यास विद्युत बिल भरणे मुख्याध्यापकांना सहज शक्य होईल १७२ शाळांचा पुरवठा खंडीत विद्युत बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील १७२ शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. यात आमगाव २७, अर्जुनी मोरगाव ३, देवरी ३५, गोंदिया २४, गोरेगाव १८, सडक-अर्जुनी १३, सालेकसा ५१ व तिरोडा येथील एका शाळेचे विद्युत कनेक्शन काढले आहे.